Soyrik Marathi Movie: मकरंद माने दिग्दर्शित
Soyrik Marathi Movie (Photo Credit - Insta)

‘नातं’.. म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे तेवढाच जपायला कठीण आहे. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन निस्वार्थची लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच आगामी सोयरीक चित्रपटात मांडण्यात आल्याचे दिग्दर्शिक मकरंद माने (Mankrand Mane) सांगतात. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण (Nitish Chavan) आणि मानसी भवाळकर (Mansi Bhavalkar) ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘सोयरीक’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला असून 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’या कौटुंबिक धाटणीच्या मनोरंजक चित्रपटात नामवंत कलाकारांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत. ‘सोयरीक’ मध्येही ते नात्यांबद्दल मंथन घडवणार आहेत. (हे ही वाचा Victoria Marathi Movie: 'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित, पुष्कर, सोनाली आणि आशयचा हटके अंदाज)

या चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे. वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन विट्ठल पाटील तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. वेशभूषा अनुतमा नायकवडी तर रंगभूषा संतोष डोंगरे यांनी केली आहे. सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत.