Sonalee Kulkarni Wedding Pics: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुबईत अडकली विवाहबंधनात; पहा तिच्या छोटेखानी लग्नाचे फोटो
सोनाली कुलकर्णी | Photo Credits: Instagram

महाराष्ट्रासह जगभरात मागील दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे निर्माण झालेली अनिश्चितता कायम आहे. या संकटामुळे अनेकांच्या भविष्यातील प्लॅन्सवर पाणी पडले आहे. अशीच स्थिती मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीची (Sonalee Kulkarni) झाली. कोरोना संकटामुळे सोनालीच्या लग्नाचे प्लॅन्स मागे-पुढे होत असतानाच अखेर तिने सामाजिक भान राखत मोठ्या सोहळ्याला कात्री लावत अवघ्या 15 मिनिटांचा आणि 4-5 जणांच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली काल (18 मे) तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच दुबई मध्ये विवाहबंधनात अडकली आहे. काल अचानक सोशल मीडीयामध्ये तिने लग्न बंधनात अडकल्याची माहिती देत चाह्त्यांना तिच्या बर्थ डे रिटर्न गिफ्ट देखील दिलं आहे.

दरम्यान सोनाली कुलकर्णी युके मध्ये विवाहबंधनात अडकणार होती पण तेथे कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेले नियम पाहता आणि भारतातील स्थिती पाहता देखील सध्या दुबईत अडकलेल्या सोनालीने लग्नाचा निर्णय घेऊन दुबईत एका मंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्नाची गाठ बांधली आहे. यावेळेस सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर यांचे कुटुंबीय देखील दुबई मध्ये नव्हते. त्यांनी देखील हा सोहळा ऑनलाईन पाहिला.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कुणाल बेनोडेकर सोबत साखरपुडा केला होता. हा सोहळा देखील दुबईमध्येच झाला होता. कुणाल कामानिमित्त दुबई असतो. तर त्याचे कुटुंब लंडन मध्ये स्थाईक आहे.