Siddharth Chandekar आणि Mitali Mayekar लग्नानंतर चांगला वेळ घालविण्यासाठी निवडले महाराष्ट्रातील 'हे' सुंदर ठिकाण, शेअर केला फोटो
Siddharth Chandekar And Mitali Mayekar at Tha Machan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नववर्षात बोहल्यावर चढले. त्यात मराठीतील एका क्युट कपलच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर जास्त होतेय. ते कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar).. 24 जानेवारी रोजी सिद्धार्थ आणि मितालीचे पुण्यात अगदी थाटामाटात लग्न झाले. या दोघांच्या केळवणापासून ते लग्नविधींपर्यंतचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियालवर व्हायरल झाले होते. लग्नानंतर आता हे नवविवाहित जोडपं एकमेकांसोबत चांगला वेळ घालविण्यासाठी महाराष्ट्रातील एका सुंदर ठिकाणी गेले आहेत. ते ठिकाण म्हणजे लोणावळा (Lonavala)...

चारही बाजूंनी हिरव्या वनराईने वेढलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत असलेल्या लोणावळ्यातील 'द मचान' (The Machan Resort) रिसॉर्टमध्ये सध्या हे दोघे गेले आहेत. तेथील फोटोज नुकतेच त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या फोटोजमध्ये मिताली छान जाळीच्या झोपळ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. तर सिद्धार्थ चा अगदी कूल लूकमधील फोटो चाहते प्रचंड पसंत करत आहेत.हेदेखील वाचा- Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर विवाहबद्ध; पहा खास क्षणांचे सुंदर Photos

पुण्यातील ढेपेवाडा येथे सिद्धार्थ मितालीचा लग्नसोहळा पार पडला. यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर सिद्धार्थने रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.

दरम्यान, मिताली झी वाहिनीवरील 'लाडाची मी लेक गं..' या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. तर सिद्धार्थ चांदेकर 'सांग तू आहे का..' या हॉरर थ्रीलर आगामी शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.