Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर विवाहबद्ध; पहा खास क्षणांचे सुंदर Photos
iddharth Chandekar-Mitali Mayekar Wedding (Photo Credits: Instagram)

Siddharth Chandekar Mitali Mayekar Got Married: मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) आज विवाहबद्ध झाले आहेत. पुण्यात अगदी थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिद्धार्थ-मितालीच्या मेहंदी, संगीत, हळदीचे फोटोज, व्हिडिओत सोशल मीडियात पाहायला मिळत होते. आज अखेर दोघांनीही कुटुंबिय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या खास क्षणांचे सुंदर फोटोज समोर आले आहेत. cinegossip सिद्धार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्याचे फोटोज इंस्टाग्रावर शेअर केले आहेत. (सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरच्या हळदी मध्ये नवरदेवच थिरकला वाजले की बारा.. वर, Watch Video)

पुण्यातील ढेपेवाडा येथे सिद्धार्थ मितालीचा लग्नसोहळा पार पडला. यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर सिद्धार्थने रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचे धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. (Mitali Mayekar Mehendi Ceremony: मिताली मयेकर च्या हातावर चढला सिद्धार्थ चांदेकर च्या प्रेमाचा रंग, पाहा मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटोज, See Pics)

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by CINEGOSSIPS (@cinegossips)

 

View this post on Instagram

 

A post shared by CINEGOSSIPS (@cinegossips)

 

View this post on Instagram

 

A post shared by CINEGOSSIPS (@cinegossips)

यापूर्वी सिद्धार्थ-मितालीच्या केळवण्याच्या फोटोजची सोशल मीडियावर धूम होती. त्यानंतर लग्नविधींचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळाले. सिद्धार्थ-मिताली यांनी 24 जानेवारी 2019 रोजी दोघांनी मुंबईत साखरपुडा केला होता. त्यानंतर दोन वर्षांनी दोघांनीही सात फेरे घेत आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

दरम्यान, मिताली झी वाहिनीवरील 'लाडाची मी लेक गं..' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थ चांदेकर 'सांग तू आहे का..' या हॉरर थ्रीलर आगामी शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.