Mitali Mayekar Mehendi Ceremony: मिताली मयेकर च्या हातावर चढला सिद्धार्थ चांदेकर च्या प्रेमाचा रंग, पाहा मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटोज, See Pics
Mitali Mayrekar Mehendi Ceremony (Photo Credits: Instagram)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेले सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांचे लग्नास आता काही तासच शिल्लक राहिले आहे. लग्नघटिका जवळ आल्याने सिद्धार्थ आणि मिताली या दोघांची मनात हुरहूर वाढू लागली असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मराठीमधील ही लोकप्रिय जोडी उद्या म्हणजेच 24 जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या संगीत सेरेमनीपासून, मेहंदी सेरेमनीपर्यंत सर्व फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. लवकरच बोहल्यावर चढणारी मितालीने आपल्या मेहंदी सेरेमनीचे (Mehendi Ceremony) सुंदर फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

या मेंहदी सेरेमनीसाठी मितालीने पांढ-या रंगाचा लेहंगा आणि मोरपिसी रंगाचा दुपट्टा असा ड्रेस परिधान केला होता. तर सिद्धार्थने देखील मोरपिसी रंगाचा कुर्ता घातला होता. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

पुण्यामध्ये सुरु असलेल्या लग्नविधी आणि त्याचे फोटोज व व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

इतकंच काय तर या मेहंदी कार्यक्रमांच्या फोटोंमध्ये सिद्धार्थ देखील मितालीच्या हातांवर मेहंदी काढताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरच्या हळदी मध्ये नवरदेवच थिरकला वाजले की बारा.. वर (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar)

थोडक्यात सिद्धार्थ आणि मिताली दोघेही आपल्या लग्नविधींमध्ये भरपूर धमाल करत आहेत हेच आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडिओज आणि फोटोजमधून दिसतय. आता खरी मजा येणार आहे ती उद्या होणा-या सिद्धार्थ-मितालीच्या लग्नसोहळ्यात. या लग्नसोहळ्याचे अपडेट्स मिळविण्यासाठी लेटेस्टली मराठीला अवश्य फॉलो करा.