Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर- मिताली मयेकरच्या हळदी मध्ये नवरदेवच थिरकला वाजले की बारा.. वर (Watch Video)
Siddharth CHandekar Mitali Mayekar Haldi | Photo Credits: Instagram/ marathistars.in

Siddharth Chandekar Mitali Mayekar Haldi Ceremony:  मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णी, मानसी नाईक नंतर आता क्युट कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar)आणि मिताली मयेकर ( Mitali Mayekar) हे लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहे. दोघांच्या घरी सध्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे. नुकताच त्यांचा हळदीचा आणि संगीत समारोह पार पडला आहे. मिताली आनि सिद्धार्थ यांना हळद लागली आहे. त्यांच्या हळदीच्या सोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मीडियात वायरल झाले आहेत. हळदी सोबतच त्यांचा संगीत समारोह देखील पार पडला आहे. यामध्ये मित्र मंडळी आणि नातेवाईकांसोबत सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघेही मराठीतील ब्लॉकबस्टर गाण्यांवर थिरकताना दिसले आहेत. Siddharth Chandekar आणि Mitali Mayekar च्या लग्नविधींना झाली सुरुवात, अभिनेत्याने मजेशीर कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो.

दरम्यान मीडियारिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि मिताली मयेकरचा विवाह सोहळा रविवार 24 जानेवारी दिवशी पार पडणार आहे. दरम्यान मुंबईमध्ये सिद्धार्थ आणि मिताली यांचा ऑक्टोबर, 2019 ला साखरपूडा पार पडला होता. त्यानंतर कोविड 19 संकटामुळे त्यांचा 2020 मध्ये होणारा विवाह सोहळा पुढे ढकलला गेला. आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांनी लग्नाची तारीख पक्की केली आहे.

सिद्धार्थ-मितालीच्या हळदीचे क्षण

 

View this post on Instagram

 

A post shared by MARATHISTARS.IN (@marathistars.in)

सिद्धार्थचा वाजले की बारा वर ठुमका...

 

View this post on Instagram

 

A post shared by MARATHISTARS.IN (@marathistars.in)

सध्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर दोघेही छोट्या पडद्यावर काम करत आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मागील काही दिवसांपासून त्यांच्या मित्रांकडे सुरू असलेल्या केळवणाचे काही फोटो शेअर करत होते.