Miss U Mister Teaser: रोमॅन्टिक अंदाजात रसिकांच्या भेटीला मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर ची जोडी (Watch Video)
Miss U Mister Teaser

सिद्धार्थ चांदेकर (Siddarth Chandekar) आणि मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) ही मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस जोडी अनेक दिवसांनंतर चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 28 जूनला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'तुझी आठवण' (Tujhi Aaathavan) या हलक्या फुलक्या रोमॅन्टिक गाण्यानंतर आता या सिनेमाचा टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’अशी या सिनेमाची टॅगलाईन असल्याने लॉंग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या एका तरूण जोडप्याची कहाणी या सिनेमातून उलगडणार आहे. Tuzi Athavan Song: मृण्मयी देशपांडे - सिद्धार्थ चांदेकरच्या आगामी Miss U Mister सिनेमामधील पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला

 

View this post on Instagram

 

वाढलेल्या अंतरातून फुलणारं प्रेम! #MissUMister #28June

A post shared by Miss U Mister (@missumisterfilm) on

'मिस यू मिस्टर' या सिनेमात मृण्यमी भारतात राहणारी 'कावेरी' ही भूमिका साकारत आहे. तर सिद्धार्थ लंडनला राहणारा 'वरूण' या मुलाची भूमिका साकारत आहे. लंडन आणि भारत अशा जगाच्या दोन वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये राहणार्‍या तरूण विवाहित जोडप्याची कहाणी, त्यांच्या आयुष्यातील चढ उतार याच्यावर भाष्य करण्यात आलं आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये काही बोल्ड सीनदेखील पहायला मिळाल्याने आता उत्सुकता वाढली आहे.

समीर जोशीने 'मिस यू मिस्टर' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात मृण्मयी, सिद्धार्थ सोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर हे कलाकार दिसणार आहेत.