Happy Birthday Sai Tamhankar: सई ताम्हणकर हिच्या वाढदिवसानिमित्त प्रिया बापट, स्वप्निल जोशी यांच्यासह 'या' कलाकारांनी खास पोस्ट करत दिल्या शुभेच्छा!
Sai Tamhankar Birthday Special (Photo Credits: Instagram)

बोल्ड,  बिनधास्त आणि ब्युटीफुल सई ताम्हणकर हिचा आज वाढदिवस. मराठी सिनेमातील चाकोरी मोडत वेगळ्या लुकचे अनेकदा बोल्डही लूकचे प्रयोग सईने केले. टीकेला न घाबरता आणि स्वत:च्या निर्णायवर ठाम राहत सईने विविधढंगी भूमिका साकारल्या आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आरुढ झाली. सिनेमे, मालिका,  वेबसिरीज, रियालिटी शोज यामधून सई प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र केवळ मराठी पुरतं मर्यादीत न राहता तिने हिंदी सिनेमांमध्येही आपलं नशिब आजमावलं. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त मराठी कलाविश्वातील तिच्या मित्र-मैत्रिणींनी, सहकाऱ्यांनी खास पोस्ट शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिया बापट, स्वप्निल जोशी, गिरीजा ओक या कलाकरांनी सईला वाढदिवसानिमित्त भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. (COLORफुल Movie New Poster: कलरफुल चित्रपटाचे नवे पोस्टर झाले प्रदर्शित, सई ताम्हणकर- ललित प्रभाकर ही जोडी प्रथमच येणार प्रेक्षकांच्या भेटीस)

प्रिया बापट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

स्वप्निल जोशी:

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

गिरीजा ओक:

प्राजक्ता माळी:

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

'दुनियादारी', 'पुणे 52', 'प्यारवाली लव्ह स्टोरी', 'वजनदार', 'धुरळा' या सिनेमातील सईच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावल्या. सध्या सई 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कॉमेडी रियालिटी शो मध्ये जज म्हणून दिसत आहे. लवकरच 'समांतर 2' या वेबसिरीजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1 जुलैपासून समांतर 2 सर्व एपिसोड्स एमएक्स प्लेयरवर पाहता येतील. यासोबतच मधुर भांडारकर यांच्या 'लॉकडाऊन इंडिया' सिनेमातही ती झळकणार आहे.