COLORफुल Movie (Photo Credits: Instagram)

सर्व मराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेला 'कलरफुल' (COLORफुल) चित्रपटाचे एक नवे पोस्टर नुकतेच समोर आले आहे. या चित्रपटाचे आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये या चित्रपटातील अभिनेता-अभिनेत्री यांचे चेहरे दाखवले नव्हते. मात्र ते पोस्टर पाहून हे दोघे कोण असतील याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र आता या दोघांचे चेहरे स्पष्ट दाखवणारा नवा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चित्रपटातील नवीन गोड जोडी असणार आहे. हा पोस्टर पाहून ललित आणि सईची कलरफुल लव्हस्टोरी पाहायला सर्वच प्रेक्षक उत्सुक आहेत.

दिग्दर्शक प्रकाश कुंटे (Prakash Kunte) आणि मूळची हिंदी निर्माती मानसी तसेच यंत्रा पिक्चर्सची निर्मिती असलेला रोमँटिक 'कलरफुल' या चित्रपटाची घोषणा नुकतीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून केली गेली होती. मात्र त्यातील प्रमुख कलाकारांबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्यात आता ललित आणि सई ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार असल्याने सर्वांची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. या दोघांनीही इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हेदेखील वाचा- Manasi Naik Engagement: मानसी नाईक होणार 'मिसेस खरेरा'; बॉक्सर, मॉडेल बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा

 

View this post on Instagram

 

Coming Soon .....

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

'कलरफुल'च्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असुन या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे.

दरम्यान सई आणि ललित करण आणि मीराची भूमिकेस न्याय देतील असा विश्वास प्रकाश कुंटे यांना आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने ललित-सई मोठ्या पडद्यावर ही जोडी कशी दिसेल याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.