Naal Trailer : नागराज मंजुळे निर्मित 'नाळ' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
नाळ सिनेमात नागराज मंजुळे (Photo Credit : Youtube)

फँडी आणि सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा नाळ रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या सिनेमात श्रीनिवास पोकळे या चिमुकला कलाकार मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याने साकारलेला चैतन्य ट्रेलरमधूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो.

नाळ सिनेमा झी स्टुडिओ आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती आहे. नागराज मंजुळेंची निर्मिती असलेला हा पहिलाच सिनेमा आहे. तर सैराट सिनेमाचे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

महाराष्ट्रातल्या छोट्याशा गावात चिमुकला चैतन्य राहतो. सिनेमात चैतन्यच्या वडीलांची भूमिका नागराज मंजूळेंनी साकारली आहे. चैतन्यचे भावविश्व, त्याचा मस्तीखोर स्वभाव आणि आई-मुलाचे नाते यावर हा सिनेमा भाष्य करतो, असे ट्रेलरमधून दिसते. पण ट्रेलरमध्ये शेवटी एक अनपेक्षित वळण पाहायला मिळते.

पाहा सिनेमाचा ट्रेलर....

सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 16 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2 मिनिटे 18 सेकंदाचा हा ट्रेलर सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवतो.