संगीतकार नरेंद्र भिडे (Musician Narendra Bhide Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. शास्त्रीय संगीताला आधुनिक बाज देत सुरवटींची गुंफन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविण्यात नरेंद्र भिडे (Narendra Bhide) यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने आज (गुरुवार, 10 डिसेंबर) पहाटे त्यांचे निधन झाले. वैकुंठधाम येथे आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी सकाळी 9.30 वाजता डॉन स्टुडिओ येथे त्यांचे पार्थीव अंतिमदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, चित्रपट आणि अल्बम्सला संगित दिले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे चाहते आणि संगीत वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे.
नरेंद्र भिडे यांची गाजलेली गाणी
- अवंतिका
- ऊन पाऊस
- कितीतरी दिवसांनी आज
- त्या पैलतिरावर मिळेल मजला
- नुपूर
- श्रावणसरी
(हेही वाचा, VJ Chitra Death: वयाच्या 28 व्या वर्षी अभिनेत्री वीजे चित्रा हिचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय)
नेरेंद्र भिडे यांनी संगितबद्ध केलेले काही चित्रपट
- मुळशी पॅटर्न
- देऊळबंद
- पुष्पक विमान
- चि सौ कां
- अनुमती
- पाऊलवाट
- रानभूल
शास्त्रीय संगीत हा नरेंद्र भिडे यांचा खास प्रांत होता. शास्त्रिय संगितालाही भिडे यांनी आधुनिक बाज दिला. त्याच्या जोरावर भीडे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. हंभीरराव सेनापती हा आगामी चित्रपट त्यांच्या सांगितीक कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरतो आहे.
नरेंद्र भिडे यांना संगिताची पार्श्वभूमी होती. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी करीअर म्हणून संगित क्षेत्र निवडले. ते नेहमी सांगत की संगित हा माझा श्वास आहे. त्यामुळे झोपेचा अपवाद वगळता संगित हे माझ्या मनात नेहमी वास्तव्यास असते. शास्त्रीय संगित शिकल्यापासून गाण्याचा प्रकार कोणताही असला तरी त्या गाण्याकडे शास्त्रीय पद्धतीने पाहण्याची दृष्टी आपणास प्राप्त झाल्याचे भिडे नेहमी सांगत असत.