VJ Chitra | (Image Credit: Instagram)

पांडियन स्टोर्स (Pandian Stores) फेम दक्षिणात्य अभिनेत्री वीजे चित्रा (, VJ Chithra) यांचा वयाच्या 28 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. चेन्नई येथील नसरपेट येथे एका हॉटेलच्या खोलीमध्ये वीजे चित्रा हिचा मृतदेह बुधवारी (9 डिसेंबर) सकाळी आढळून (Chithra Found Dead) आला. त्यांना आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली.

प्राप्त माहितीनुसार, वीजे चित्रा यांनी चित्रिकरण संपल्यानंतर रात्री उशीरा हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर काही काळाने हॉटेलच्या रिशेप्शन विभागाला त्या मृत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क करण्यात आला.

वीजे चित्रा या प्रामुख्याने टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांना पांडियन स्टोर्स मालिकेमुळे अधिक ओळखले जाते. त्या प्रदीर्घ काळापासून त्या मालिकेत मुलई नामक व्यक्तीरेखा साकारत होत्या. त्यांची लोकप्रियता या मालिकेमुळे प्रचंड वाढली होती. परंतू आता त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि निकटवर्तीयांना धक्का बसला आहे. (हेही वाचा, Divya Bhatnagar Passes Away: 'ये' रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागर चे निधन, कोरोनाची झाली होती लागण)

ऑगस्टमध्ये लग्न डिसेंबरमध्ये मृत्यू

वीजे चित्रा यांचे कुटुंबीय चेन्नई येथेच राहतात. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी उद्योगपती हेमंत रवी यांच्यासोबत विवाह केला होता. लग्नाला अवघे काहीच महिने झाले असताना त्यांचा मृत्यू होणे अनेकांना चटका लावून गेला आहे. चित्रा यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप तरी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया पुढे आली नाही.

यंदाचे वर्ष (2020) मनोरंजन क्षेत्रासाठी काहीसे धक्कादायक आणि तितकेच निराशाजनक ठरले आहे. या वर्षा अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपले जीवन संपवले. काहींचे निधन झाले.