Divya Bhatnagar Passes Away: 'ये' रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागर चे निधन, कोरोनाची झाली होती लागण
स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, दिव्याला 28 नोव्हेंबरला आपण कोरोना संक्रमित असल्याचे कळले. त्यानंतर तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली.
कोरोना व्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटी, क्रिकेटर सारख्या अनेक दिग्गजांचा देखील समावेश आहे. यात अनेक सेलिब्रिटी कोरोनाचे बळी देखील ठरले आहेत. त्यात आता लोकप्रिय मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Ye Rishta Kya Kehlata Hai) मधील अभिनेत्री दिव्या भटनागर (Divya Bhatnagar) हिचे देखील निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोरोनाशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, दिव्याला 28 नोव्हेंबरला आपण कोरोना संक्रमित असल्याचे कळले. त्यानंतर तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत गेली.
तिच्या कुटूंबियांनी तिला गोरेगावच्या SRV रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र तिच्या तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने तिला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती गेले कित्येक दिवस कोरोनाशी झुंज देत होती. मात्र आज सकाळी 3 च्या सुमारास तिने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तिच्या जाण्याने टिव्ही जगतातून शोक व्यक्त केला जात आहे.
View this post on Instagram
दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या निधनाची बातमी दिली. कोरोना संक्रमित असलेल्या दिव्याची कोरोनामुळे तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती असे सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Actor Ravi Patwardhan Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड; वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन
View this post on Instagram
तिच्या या अशा अचानक एक्झिटने टिव्ही जगतातील अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. यात देवलीना भट्टाचार्जी आणि शिल्पा शिरोडकर ने त्यांचा दिव्यासोबत फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली दिली.
दिव्या भटनागर विषयी बोलायचे झाले तर तिने आर्टिस्ट मॅनेजर गगनशी लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दिव्याच्या आईने एका मुलाखतीदरम्यान दिव्याच्या पतीला फ्रॉड असल्याचे म्हटले होते.
(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2020 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

