Mann Fakira Teaser Out: सुव्रत जोशी आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच मराठी पडद्यावर; नात्यातील गुंतागुंत वाढणार की सुटणार? समजणार व्हॅलेंटाईन डे ला
Mann Fakira (Photo Credits: Instagram)

Mann Fakira Teaser Out: मन फकिरा या आगामी मराठी चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांना सुव्रत जोशी आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं वैशिष्ठ्य म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मन फकिराच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी या टीझरचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याला फॅन्सकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

टीझरमध्ये आपल्याला दिसते की रिया आणि भूषणचं टिपिकल कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमासोबत अरेंज मॅरेज होते. परंतु, लग्न झाल्यावर आपल्याला दिसते की या जोडप्याचं एकमेकांवर प्रेम नसते तर दोघांचेही बाहेर प्रेम प्रकरण असते. एकूणच या टीझरवरून आपल्याला चित्रपटाचे कथानक काय असू शकते याची कल्पना येते. सिनेमात सुव्रत भूषण हे पात्र साकारत आहे तर सायली संजीव त्याच्या बायकोच्या म्हणजेच रियाच्या रूपात दिसत आहे. नातेसंबंधांवर भाष्य करणारा हा चित्रपट ३ कथांभोवती फिरताना दिसेल असा अंदाज या ट्रेलरमधून येतो. भूषण आणि रियाच्या लग्नाची एक गोष्ट, रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडची दुसरी गोष्ट तर भूषण आणि त्याच्या गर्लफ्रेंडची तिसरी गोष्ट.एकूणच प्रेमाची गुंतागुंत यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

या व्हॅलेन्टाईन्स डे चा काय प्लॅन? बायको की गर्लफ्रेंड? नवरा की बॉयफ्रेंड..? टीझर बघून तुम्हीच ठरवा. 😜🤔 #मनफकीरा #MannFakiraa Teaser Out Now #14Feb2020 Written & Directed By: @mrunmayeedeshpande @purplebullent | #SmitaFilmsProductions @suvratjoshi | @sayali_sanjeev_official | @anjalipatilofficial | @Ankitmohan | #RenukaDaftardar #SmitaVinayGanu | #NitinPrakashVaidya | @iomprakashbhatt | #SujayShankarwar | #TruptiKulkarni | @pranav105 | @sachingurav | @sunnybakshiinmumbai | #GingerPR | @vizualjunkies

A post shared by Mrunmayee Deshpande (@mrunmayeedeshpande) on

प्रेम... आहे, नाही, बहुतेक वगैरे... अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून हा सिनेमा व्हॅलेंटाईन डे ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. तर सुव्रत आणि सायलीसोबत आपल्याला अंजली पाटील आणि अंकित मोहन हे दोन कलाकार महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.