महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा गाजलेला चित्रपट 'झपाटलेला' (Zapatlela) आजही लोकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विनोदी अभिनय, तात्या विंचू, कुबड्या खवीस, महेश जाधव यांसारखी पात्र आजही लोकांना तितकीच जवळीची वाटतात. त्यामुळे कधीही हा चित्रपट टीव्हीवर लागला लोक आजही तो पाहणे तेवढेच पसंत करतात. मात्र आता या लोकांमध्ये या चित्रपटातील अभिनेते,दिग्दर्शक आणि लेखक महेश कोठारे यांच्या चिमुकल्या नातीचा समावेश झाला आहे. महेश कोठारे यांची नात जिजा (Jija) हा चित्रपट टीव्हीवर पाहत असताना तिने गोड अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिली.
ही गोड आणि मजेशीर प्रतिक्रिया म्हणजे या चित्रपटातील तात्या विंचूचाचा लोकप्रिय डायलॉग, 'ओम फट स्वाहा'... हेदेखील वाचा- Happy Birthday Mahesh Kothare: ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना योगायोगाने मिळाला बालकलाकार म्हणून पहिला मराठी चित्रपट, जाणून घ्या कहाणी
Watch Video
View this post on Instagram
🎬1..2..3... Om phat swaaha 👻 #sunday #movietime #zapatlela #tatyavinchu 🤡
हा व्हिडिओ जिजाची आई अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जिजा हा चित्रपट आपले आजोबा महेश कोठारे यांच्यासोबत पाहताना दिसत आहे. त्यामुळे जिजाच्या या क्युट प्रतिक्रियेनंतर महेश कोठारे यांना देखील हसू आवरले आहे. उर्मिला ने हा व्हिडिओ शूट केला आहे.
हिंदीप्रमाणे मराठीतील अनेक स्टारकिड्स सोशल मिडियावर लोकप्रिय आहेत. त्यात जिजा ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय स्टारकिड्स आहे. तिचे अनेक व्हिडिओ, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.