Pandu Marathi Movie: पांडूच्या अतरंगी उषाचा बेधडक अंदाज, महाराष्ट्राची लाडकी जोडी प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा सज्ज
Pandu Marathi Movie (Photo Credit - Instagram)

गेल्या काही दिवसांपासून अभिनेते भाऊ कदम (Bhavu Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) मुख्य भूमिकेत असणारा ‘पांडू’ (Pandu) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषण झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या पांडूच्या आयुष्यात झालीये एक ग्लॅमरस एंट्री. ती आहे उषाची. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) यात उषाच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सोनाली बेधडक अंदाजत दिसणार आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेला आणि विजू माने (VijuMane) यांनी दिग्दर्शित केलेला 'पांडू' येत्या 3 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाला अवधूत गुप्तेंच्या संगीताची साथ लाभली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

'भाऊ कदम' आपल्याला 'पांडू' च्या भूमिकेत तर कुशल बद्रिके 'महादू'च्या भूमिकेत दिसणार आहे. ही महाराष्ट्राची लाडकी जोडी मोठा पडदा गाजवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालीये. (हे ही वाचा Zombivali Marathi Movie: आतुरता संपली, या दिवशी 'झोंबिवली' होणार प्रदर्शित.)

तसेच या चित्रपटात प्रविण तरडे हे एका शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारणार आहेत. या चित्रपटातील ‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं नुकताच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामधून प्रविण तरडेंचा हा वेगळा लुक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.