Kulkarni Chowkatala Deshpande (Photo Credits: File Image)

अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) लवकरच प्रेक्षकांपुढे घेऊन येत आहे 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' हा नवा चित्रपट. या नव्या सिनेमाचं कथानकनुसार प्रत्येकाच्या आयुष्यात तरुणीची, स्त्रीची, आईची आणि बायकोची भूमिका किती महत्त्वाची असते व त्याच स्त्रीला किती तडजोडी कराव्या लागतात यावर भाष्य करणारं असेल.

या चित्रपटाचा आजच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरची सुरुवात सई ताम्हणकरच्या बोल्ड वाक्याने होते आणि त्यानंतर टप्याटप्याने उलगडत जाते ती म्हणजे सईने साकारलेल्या भूमिकेची झलक.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटात सईसोबत अभिनेते निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. निखिलने सईच्या नवऱ्याचे पात्र साकारणार आहे. त्याचं हे पात्र कसं आहे तसेच त्याचा स्वभाव कसा आहे याची कल्पना प्रेक्षकांना या ट्रेलरमधून येते. त्याचसोबत सईला राजेशने साकारलेल्या पात्राची कशी साथ मिळते हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Hirkani Movie Review: आईच्या शौर्यगाथेची भव्यदिव्य मांडणी परंतु तितकंसं न भावलेलं दिग्दर्शन

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्मिता गानू यांनी केली आहे.