छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या झंझावातासह त्यांच्या मावळ्यांनी मुघलांशी लढा दिला. या लढ्यातील एक असे नाव जे कोणताही मराठा विसरणार नाही ते म्हणजे 'बाजीप्रभू देशपांडे.' त्यांच्या पन्हाळगडावरील शौर्यावर आधारित 'जंगजौहर' (JungJauhar) या चित्रपटाचे नाव आता 'पावनखिंड' (Pavankhind) ठेवण्यात आले आहे. बाजीप्रभूंच्या रक्ताने पन्हाळगड पावन झाला. म्हणूनच या गडाला पावनखिंड असे नाव देण्यात आले. म्हणूनच या चित्रपटाचे नाव आता पावनखिंड ठेवण्यात आले आहे. येत्या 10 जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' या चित्रपटाच्या निर्मातीची धुरा अजय-अनिरुद्ध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) शिवछत्रपतींची भूमिका साकारताना दिसेल.हेदेखील वाचा-JungJauhar Poster: दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' सिनेमामधून साकारणार पावनखिंडीमधील बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा
View this post on Instagram
चिन्मय मांडलेकरसह या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह क्षिती जोग, , समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, अंकित मोहन अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. यात पावनखिंडीवर ऐतिहासिक लढा दाखविण्यात आला आहे.
बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची 'पावनखिंड' मधून उलगडणारी बलिदानगाथा प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक असेल. यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांमधील 'फर्जंद' आणि फस्तेशिकस्त ला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या तिसर्या पराक्रम गाथेबद्दलही शिवप्रेमी आणि रसिकांमध्ये उत्सुकता आहे.
या सिनेमाची निर्मिती ए ए फिल्म्स (AA Films) आणि आल्मंड्स क्रिएशंस प्रेझेन्टेशन (Almonds Creations presentation)यांनी केली आहे.