JungJauhar Poster: दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' सिनेमामधून साकारणार पावनखिंडीमधील बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अमर बलिदानाची गाथा
JungJauhar Poster| Photo Credits: Instagram/almondscreations

फर्जंद आणि फस्तेशिकस्त या चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचा तिसरा सिनेमा 'जंगजौहर' पुन्हा मराठी रूपेरी पडद्यावर पराक्रमाची गाथा सांगणार आहे. आज या सिनेमाचं पोस्टर रीलीज करण्यात आलं आहे. या सिनेमामध्ये बाजीप्रभू यांचा पावनखिंडीमधला थरार रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. नरवीर बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांपैकी एक होते. पन्हाळगडाला सिद्दी मसूदचा वेढा असताना मोठ्या शिताफीने छत्रपती शिवाजीराजे यांनी विशालगडाकडे मार्गक्रमण केले होते. या प्रसंगी राजे गडावर पोहचले पर्यंत बाजीप्रभूंनी खिंड लढवली होती. अवघ्या 600 जणांसोबतचा त्यांचा हा पराक्रम आता भव्य स्वरूपात लोकांसमोर येणार आहे.

'जंगजौहर' या सिनेमामध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबत चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, अंकित मोहन झळकणार आहेत. या सिनेमाची निर्मिती ए ए फिल्म्स (AA Films) आणि आल्मंड्स क्रिएशंस प्रेझेन्टेशन (Almonds Creations presentation)यांनी केली आहे.

जंग जौहर सिनेमाचे पोस्टर

 

View this post on Instagram

 

"श्री बाजींचे रक्त पेरिलें खिंडीत त्या काळा म्हणुनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला" नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा... 'जंगजौहर', हे आमचं सिनेमारूपी पुष्प श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणी अर्पण... #जंगजौहर #JungJauhar AA Films In Association with Almonds Creations presents Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar @chinmay_d_mandlekar @ajay.purkar @harishh_dd #SunilJadhav @ankittmohan @akshayswaghmare @mrinalmrinal2 @sameerdharmadhikari @aastadkale #ShushrutMankani @rishi_saxena_official @ajinkya_nanaware @s.bhilare7 #SurajPilley @mahesh_ghag13 #AmirTalekar #JayendraMore #MadhaviNimkar @prajakta_official @rajanbhise #RohanMankani @daveruchi @nikhilslanjekar @pratikredij #VaibhavGalandePatil #SubhodPatil @aman_alkunte #BabbuKhanna #AmolGoley @sanika_gadgil #PournimaOak

A post shared by Almonds Creations (@almondscreations) on

दरम्यान जून महिन्यात रायगडावर शिवपालखीच्या पूजनानंतर ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या संहितेचे विधीवत पूजन चित्रपटाच्या संपूर्ण टिमच्या सोबतीने करण्यात आले होते. अद्याप जंगजौहर सिनेमाच्या रिलीज डेट बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यापूर्वी शिवाजी महाराजांच्या पराक्रम गाथांमधील 'फर्जंद' आणि फस्तेशिकस्त ला रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता या तिसर्‍या पराक्रम गाथेबद्दलही शिवप्रेमी आणि रसिकांमध्ये उत्सुकता आहे.