Happy Birthday Aarya Ambekar: लिटिल चॅम्प्स ते अभिनेत्री प्रवास करणार्‍या गोड गळ्याच्या आर्या आंबेकरच्या आवाजातील सुपरहीट गाणी
Aarya Ambekar| Photo Credits: Instagram

महाराष्ट्राला आपल्या आवजाने मंत्रमुग्ध करणार्‍या महाराष्ट्राच्या 5 लिटील चॅम्प्स पैकी एक आर्या आंबेकर. आर्या ने लिटील चॅम्प्स मध्ये प्रेक्षकांना जादुई आवाजाने खिळवून ठेवलंच पण नंतर संगीत क्षेत्राप्रमाणेच अभिनयातही तिने आपली चुणूक दाखवली आहे. आर्या आंबेकर सध्या रसिकांना जितकी तिच्या गोड आवाजाने मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे तितकीच ती अभिनयातूनही छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. आज आर्या 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. लवकरच झी मराठी वर आर्या सह सारे लिटिल चॅम्प्स परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे तिच्या इनिंगला शुभेच्छा देत आज तिच्या बर्थ डे दिवशी तिच्याच आवाजातही ही काही गोड ऐकून, मित्र मंडळींसोबत शेअर करून आर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.

आर्याचा जन्म मूळचा नागपूरचा आहे. आई कडेच आर्याने संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून आर्या अभिनेत्री म्हणून समोर आली पण तिने गायन दूर सारलेले नाही. अनेक मराठी सिनेमे, अल्बम सोबतच आता मालिकांच्या शीर्षक गीतांमधूनही आर्या घराघरामध्ये पोहचली आहे.

माझा होशील ना टायटल ट्रॅक

हृद्यात वाजे समथिंग

नरवर कृष्णा समान

आई कुठे काय करते टायटल ट्रॅक

किशोरी आमोणकरांसाठी मानवंदना

जरा जरा

 

आर्या आंबेकर ने 2008 साली  माणिक वर्मा शिष्यवृत्ती मिळवली आणि तिचा संगीत क्षेत्रातील आलेख चढताच राहिला. नंतर 2012 साली डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, 2019 साली सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार पटकावला आहे.