Shreyas Talpade Marathi Movie: श्रेयसे तळपदे कडून चाहत्यांना गुड न्यूज, या चित्रपटात पदार्पण; सिनेमात पोस्टर केलं शेअर
Hi Anokhi Gath PC INSTA

Shreyas Talpade Marathi Movie: श्रेयस तळपदे हिंदी आणि मराठी चित्रपटात आघाडीचा अभिनेता आहे.श्रेयसने आजवर अनेक चित्रपट गाजवले आहे. गेल्या वर्षी श्रेयसला शुटींग दरम्यान ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे चाहत्यांना देखील मोठा दु:खाचा धक्का लागला होता. आता आजारपणावर मात करत श्रेयस नव्याने सुरवात करत असल्याची गोड बातमी चाहत्यांना मिळाली आहे. श्रेयस नव्या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे.( हेही वाचा- अभिनेते Ashok Saraf यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर)

मीडिया रिपोर्टनुसार, महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ या मराठी चित्रपटातून श्रेयस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात श्रेयस मुख्य भुमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस तळपदे सोबत गौरी इंगवले या चित्रपटात झळकणार आहे.

श्रेयसने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केला आहे. पोस्ट मध्ये लिहलं आहे की, नव्या वर्षाची सुरूवात एका नव्या कोर्या मराठी सिनेमाने…..झी स्टुडिओज् प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी 'ही अनोखी गाठ'.1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित. चित्रपटाच्या पोस्टरवरून पाहायला मिळते की,दोघांची आगळी वेगळी प्रेमकहाणी चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहून चाहत्यांनी शुभेच्छा देत उत्सुकता दाखवली आहे. पहिल्यांदा एक हटके जोडी मुख्य भुमिकेत झळकणार असल्याने चाहते खुश झाले आहे.