मराठी रंगभूमी, सिनेमा, मालिका सह हिंदीतही आपल्या खुमासदार विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र राज्य सरकार कडून 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. सध्या अशोक सराफ 76 वर्षांचे आहेत. सध्या ते मोजक्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. पुढे मराठी नाटकं, सिनेमा, हिंदी मालिका, हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केले. 'हम पांच' या हिंदी मालिकेतून ते देशभर पोहचले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अशोक सराफ यांनी अनेक मराठी सिनेमांमधून काम केले आहे. सिनेमात अनेकदा विनोदी भूमिकेत दिसणारे अशोक सराफ वास्तविक आयुष्यात शांत, मितभाषी आहेत. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ देखील अभिनेत्री आहेत. निवेदिता आजही मराठी मालिका, चित्रपटांमधून काम करत आहेत. तर अशोक आणि निवेदिता यांचा मुलगा शेफ असून तो परदेशी वास्तव्याला आहे. Raj Thackeray on Ashok Saraf: अशोक सराफ दक्षिणेत असते, तर ते आज मुख्यमंत्री असते; अशोक पर्व कार्यक्रमात राज ठाकरे यांचे वक्तव्य .
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला, मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोकमामांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण जाहीर होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
मराठी… pic.twitter.com/Ej4o4KUNce
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 30, 2024
'अशी ही बनवाबनवी', 'भूताचा भाऊ', 'गंमत जंमत', 'चौकट राजा' , 'गुपचूप गुपचूप', ''कळत नकळत', ' बिनकामाचा नवरा' हे अशोक सराफ यांचे सिनेमे विशेष गाजले. अशोक सराफ यांनी विनोदी सह काही खलनायकाच्या देखील भूमिकांमधून प्रेक्षकांंची मनं जिंकली आहेत.
जानेवारी, 2023 च्या निकषानुसार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रोख, शाल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. मागील वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला होता.