Bigg Boss फेम अनिल थत्ते यांना कोरना व्हायरस संसर्ग; रुग्णालयात उपचार सुरु
Anil Thatte | (Photo Credits: Twitter)

अनिल थत्ते (Anil Thatte) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. आपली चित्रविचीत्र पोषाख पद्धती आणि गगनभेदी या साप्ताहिकामुळे राज्यभर आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात अनिल थत्ते आगोदरच यशस्वी ठरले आहेत. मराठी बिग बॉस (Marathi Bigg Boss) या रिअॅलिटी शोमध्येही त्यांचा सहभाग दिसून आला होता. त्यामुळे त्यांना बिग बॉस फेम म्हणूनही ओळखले जाऊ लागले. आपल्याला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती अनिल थत्ते यांनी स्वत:च फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

फेसबुल व्हिडिओमध्ये अनिल थत्ते यांनी सांगितले की, आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. रायजन हॉस्पिटलमध्ये आणि मला कोरना व्हायरस संसर्ग झाला आहे. गेले दोन महिने 60 दिवस मी घरात बसून होतो. आणि वर्क फ्रॉम करत होतो. जेव्हा व्हायचा तेव्हा झाला. इतकी काळजी घेऊनही तो होत असेल तर काय करायचं. पण, ठिक आहे. तो एकदाचा झाला. तो व्हायचा तेव्हा होणार या निर्णयाप्रत मी आलो. त्यामुळे एक झाले. आता माझी कोरोनाची भीती संपली.  हेही वाचा, ( Maharashtra Assembly Election 2019: अभिजित बिचुकले यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी तीनपट श्रीमंत; पहा किती आहे बिचुकले दांपत्याची एकूण संपत्ती)

व्हिडिओ पुढे बोलताना अनिल थत्ते यांनी म्हटले आहे की, मला मधुमेह आणि अन्य अजारही आहेत. त्यामुळे डॉक्टरही म्हणाले होते आम्हाला काळजी वाटत होती. परंतू, आता काळजीचे कारण नाही. प्रकती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आता कोरोना व्हायरसमधून बरा झालो की पहिले काम करणार. मी प्लाझ्मा देणार. ज्यांना कुणाला कोरोना व्हायरस झाला असेल त्यांच्यासाठी तो उपयोगी येईल, असेही थत्ते यांनी या वेळी सांगितले.