
बिग बॉस मराठी 5 च्या घरात जसा खेळ रंगत आहे तशी भांडणांची तीव्रता देखील वाढती आहे. रितेश देशमुख सूत्रसंचालकाच्या भूमिकेत हा पहिलाच सीझन आहे. यंदा रितेशच्या 'भाऊच्या धक्क्याने' मागील सीझनचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. दरम्यान या सीझन मध्ये सुरूवातीला वर्षा उसगावकर आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये वाद झाला होता आणि आता कालच्या भागात टास्क दरम्यान जान्हवी किल्लेदार ने पंढरीनाथ कांबळी वर त्याच्या करियर मधील कारकीर्दीवर केलेली टीपण्णी मराठी कलाकारांच्या जिव्हारी लागली आहे.
जान्हवी किल्लेदार काय म्हणाली?
"पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत.” असं विधान जान्हवीने केलं आहे. यानंतर आर्याने जान्हवीला तिच्या वक्तव्याचा जाब देखील विचारला मात्र तेव्हाही जान्हवीने तिला धुडकावून लावलं. दरम्यान पॅडीने जान्हवीला हे विधान बाहेर महागात पडणार असल्याचं म्हटलं आहे. Bigg Boss Marathi 5: अभिजीतला 'बांगड्या घाल' म्हणणं जान्हवीला पडणार भारी; रितेश देशमुखे दिली घरा बाहेर काढण्याची धमकी .
मराठी कलाकारांचा संताप
विशाखा सुभेदार पोस्ट
सुरेखा कुडची
View this post on Instagram
दरम्यान जान्हवी किल्लेदारच्या पतीने जान्हवीचं समर्थन करणारी पोस्ट केली आहे. बिग बॉसच्या घरात यापूर्वी निक्कीने देखील वर्षा उसगावकर यांच्याबद्दल बोलताना तारतम्य न बाळगल्याने बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही टीका होताना दिसली होती.