Amruta Khanvilkar Emotional Post: अमृता खानविलकर कोसळला दुख:चा डोंगर; सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट
Amruta Khanvilkar (PC - Instagram)

Amruta Khanvilkar Emotional Post: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. या चित्रपटात अमृताने आपल्या डान्स आणि अदांनी प्रेक्षकांनान घायाळ केलं. मात्र, सध्या अभिनेत्रीची एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधून तिने आपण आपल्या मावशीचे निधन झाल्याचं सांगितलं आहे.

मावशीच्या निधनामुळे खानविलकर कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. अमृताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मावशी विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मावशीचा फोटो शेअर करत अमृताने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा .... छान रहा .... नीट रहा आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील तू परत लहान होऊन जा. " (हेही वाचा - Daagdi Chaawl 2 Trailer: 'दगडी चाळ 2' चा ट्रेलर प्रदर्शित; 19 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

पुढे अमृताने म्हटलं आहे की, "तू आज पर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी, आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा मी अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर. नाहीतर आम्ही हरवलो असतो. माऊ तुला खूप मिस करणार ग तुला. अजून आपल्याला किती फिरायचं होतं. बोलायचं होतं. मॉम आणि मला तुला खूप काही सांगायचं होतं. सगळंच राहून गेलं. पण, माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.''

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

माझ्या माऊशीपेक्षा तू माझ्यासाठी आई होतीस. आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये पुढे ढकलण्यापर्यंत तु नेहमीच आमच्या पाठिशी होतीस. या शेवटपर्यंत मला तुझी आठवण येईल. तु केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की, तु एका चांगल्या ठिकाणी आहेस. जिथे तु शेवटी शांततेत विश्रांती घेऊ शकशील. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करीन, अशा शब्दांत अमृताने आपल्या मावशीप्रती भावना व्यक्त केल्या आहेत.