Lok Sabha Elections 2019: हिंदूंच्या भावना दुखावल्याचा उर्मिला मातोंडकर हिच्यावर आरोप; उर्मिलाने दिले सडेतोड उत्तर
Urmila Matondkar (Photo Credits: Instagram)

अलिकडेच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. उत्तर मुंबई मतदारसंघातून (Mumbai North Central Lok Sabha Constituency) निवडणूकीचे तिकीट जाहीर झाल्यानंतर तिने प्रचार सुरु सुरुवात केली. आता ती निवडणूकीचा जोरदार प्रचार करत आहे. मात्र उर्मिला मातोंडकरने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गंभीर आरोप भाजपा (BJP) नेता सुरेश नाखवा यांनी केला आहे. इतकंच नाही तर उर्मिला विरोधात मुंबईच्या पवई पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर उर्मिलाने सडेतोड उत्तर दिले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर हिने लहान मुलांसाठी गायले गाणे (Watch Video)

उर्मिला म्हणाली की, ज्या व्यक्तीने माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तो भाजपचा नेता आहे. माझे बोलणे चुकीच्या पद्धतीने समोर मांडण्यात आले आहे. मी माझ्या मुलाखतीत भाजपकडून हिंदू धर्माच्या नावाखाली फोफावत चाललेल्या हिंसक विचारधारेविरोधात आवाज उठवला आहे. यामुळे आपल्या महान हिंदू धर्माचा अपमान होत आहे. भाजपच्या या विचारधारेवर मी आपेक्ष घेतला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उर्मिला मातोंडकर बनली 'रिक्षाचालक' (Photos)

उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवताना उर्मिलाला भाजपचे गोपाल शेट्टी यांचे तगडे आव्हान आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत संजय निरुपम यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर 2004 मध्ये अभिनेता गोविंदाने या मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उडी घेतली होती.