
'मुळशी पॅटर्न' चित्रपटात गण्या ही भूमिका साकारणारा क्षितिश दाते (Kshitish Date) आणि 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा आपटे (Rucha Apte) हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर आज त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांच्या मित्रपरिवाराने सोशल मिडियावर शेअर करुन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋचा आपटे हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसला आपल्या लग्नाचे फोटो शेअर केलेल्या मित्रपरिवाराच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत.
अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता शिवराज वायचळ, अक्षय वाघमारे, स्वानंदी टिकेकर, आशुतोष गोखले अशा अनेक सेलिब्रिटींनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- Siddharth Chandekar Mitali Mayekar Wedding: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर विवाहबद्ध; पहा खास क्षणांचे सुंदर Photos

ऋचा आणि क्षितिश ह्या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्षितिशची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातली गण्या ही भूमिका प्रचंड गाजली. आता तो लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही दिसणार आहे. हे दोघेही ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र दिसले होते.

तर ऋचा सध्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत काम करत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांमध्येही ती दिसली होती. तसंच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही तिने कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.
यावर्षी अनेक मराठी सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले. मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, मानसी नाईक यांचे यावर्षी लग्न झाले. या सर्वांचा लग्नसोहळा आणि लग्नविधींचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.