'करीना कपूर'चे छोट्या पडद्यावर पदार्पण; Dance India Dance शो जज करण्यासाठी तब्बल 80 कोटी मानधन, Watch Promo
Kareena Kapoor in Dance India Dance (Photo Credits: Zee TV/Twitter)

Kareena Kapoor TV Debut: आजकाल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक यशस्वी मध्यम म्हणून टीव्हीकडे पहिले जाते. कामाचा वेळ आणि मिळणारे मानधन पाहून अनेक कलाकार टीव्हीचा मार्ग निवडतात. याला बॉलिवूडचे स्टार्सदेखील अपवाद कसे ठरतील? तर अगदी अमिताभ बच्चनपासून अनेक मान्यवरांनी टीव्हीवर आपले नशीब आजमावले आहे. त्यात आता एका नव्या अभिनेत्रीची भर पडत आहे. ती म्हणजे करीना कपूर. करीना कपूर लवकरच ‘डान्स इंडिया डान्स’ (Dance India Dance) या रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. छोट्या पडद्यावर करीनाचा हा डेब्यू शो आहे, त्यामुळे यासाठी तिने तशीच तगडी फी आकारली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर या शोच्या 30 एपिसोड्ससाठी करीनाला तब्बल 80 कोट रुपये मानधन देण्यात येणार आहे. या शोसाठी करीनाने तिच्या बॉलिवूडच्या प्रोजेक्ट्सवर पाणी सोडले आहे, तसेच या शोच्या सेटवरही तिला बराच वेळ खर्च करावा लागणार आहे त्यामुळे तिने इतक्या जास्त मानधनाची मागणी केली आहे. नुकताच या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये करीना तिच्या ‘पू’ स्टाईलमध्ये एन्ट्री करताना आणि या शोच्या टायटल ट्रॅकवर थिरकताना दिसत आहे. लवकरच या शोचे शुटींग सुरु होणार असून, जूनमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा: Taimur Diet Plan: बाहेरचे काहीही खाण्यास मनाई; करीना स्वतः बनवते तैमुरचा डायट प्लॅन, पहा कोणत्या गोष्टींचा असतो समावेश)

धीरज धुपर (Dheeraj Dhoopar) या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. या शोमध्ये करीनासोबत अजून दोन जज असणार आहेत. 30 मेला या शोची पत्रकार परिषद होणार आहे, त्यावेळी याबाबत अजून माहिती मिळेल. दरम्यान करीनाचा 'गुड न्यूज' हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तसेच तिने अंग्रेजी मीडियम (Angrezi Medium) चे शुटींगही सुरु केले आहे. या चित्रपटासाठी तिने 8 कोटी रुपयांची मागणी केली होती. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये करीना करण जोहरच्या ‘तख्त’चे शुटींग सुरु करेल.