एयरपोर्ट वरील गर्दीत करीना करतेय लग्नाची तयारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Kareena Kapoor At Airport (Photo Credits: Yogen Shah, Instagram)

अभिनेत्री करिना कपूर (Kareeena Kapoor) हिचा लाल पंजाबी सूट मधील अस्सल 'भारतीय नारी' लूक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे मात्र त्याही पेक्षा हा लूक साकारायला करिनाने निवडलेली जागा आणखीनच लक्षवेधी ठरत आहे. इंस्टाग्राम (Instagram) वर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये करीना चक्क विमानतळावर बसून या ड्रेसमध्ये तयार होत असल्याचे दिसत आहे. त्याचं झालं असं की, आपला चुलत भाऊ अरमान जैन (Arman Jain) याच्या रोका सेरेमनी साठी तिने हा ड्रेस परिधान केला होता.मात्र याच दिवशी तिला बंगळुरूमध्ये (Bangalore) एका दुकानाच्या उदघाट्नासाठी जायचे होते, या धावपळीत वेळ वाचावा म्ह्णून तिने विमानतळावरच आपल्या हेअर अँड मेक अप टीम ला बोलावून तयारी केली. एयरपोर्टच्या गर्दीत करीनाची टीम तिचा मेकअप करत असतानाचा व्हिडीओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अरमान जैन हा करिनाचा चुलत भाऊ आहे. त्याने 2014 मध्ये 'लेकर हम दीवाना दिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. काल त्याने आपली गर्लफ्रेंड अनिश मल्होत्रा हिच्यासोबत रोका केला. या कार्यक्रमाला बेबो, पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर यांच्यासोबत पोहचली होती.

करीना कपूर व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

This is how we do it .... Getting ready at the airport for #armaankishaadi

A post shared by Naina Sawhney (@nainas89) on

करिना कपूर- सैफ अली खान यांच्या प्रेम प्रकरणाबाबत प्रथम 'या' कलाकाराला कळले होते

 दरम्यान, सध्या करीना आपला सिनेमा गुड न्यूज याच्या प्रमोशनमध्ये भारी व्यस्त आहे. याशिवाय पुढच्या वर्षी इरफान खान सोबततिचा 'अंग्रेजी मीडियम' आणि करण जोहरच्या मल्टी-स्टारर 'तख्त' सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.