कॉमेडी किंग कपिल शर्मा-गिन्नी चतरथ यांच्या घरी चिमुकलीचं आगमन; गुरू रंधावा, सायना नेहवाल यांच्यासह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Kapil Sharma | Photo Credits: Instagram

कॉमेडीयन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या आयुष्यात आता एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. कपिल शर्माने ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीला ट्विटरच्या माध्यमातून गायक गुरू रंधावा, युट्युबर भुवन बामने शुभेच्छा दिल्या आहे. तर चाहत्यांनीदेखील कपिल शर्माच्या गोड बातमीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कपिल आणि गिन्नी यांचं मागील वर्षीच लग्न झालं होतं. Kapil Sharma च्या सेट वर जेव्हा Riteish Deshmukh आणि Akshay Kumar मधला फरक धूसर होतो; वाचा सविस्तर

कपिल आणि गिन्नी हे शालेय जीवनापासून एकत्र होते. कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि डिसेंबर 2018 मध्ये ते विवाहबद्ध झाले. कपिल नैराश्यात होता तेव्हा 2017 साली त्याच्या आजारपणात गिन्नीने त्याला साथ दिली होती.

कपिल शर्मा याचं ट्वीट

गुरू रंधावाच्या शुभेच्छा

कपिल शर्माने पत्नी गिन्नीसाठी ऑक्टोबर महिन्यात खास बेबी शॉवर पार्टीचं आयोजन केलं होतं. या बेबी शॉवर पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 'कपिल शर्मा शो' चे देखील अनेक कलाकार कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा देण्यासाठी पोहचले होते. कपिल आणि गिन्नी बेबी मूनसाठी कॅनाडाला गेले होते. त्याचे फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.