Kangana Ranaut: अभिनेत्री आणि नवनिर्वाची खासदार कंगना राणौतने पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ शेअर इन्स्टाग्रामवर (Instagram)करत भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामाप्रती असलेल्या भावनांबाबत पोस्ट शेअर केली आहे. यात तिने स्व:ताचे मत देखील मांडले आहे. भारताला देश म्हणून पुढे घेऊन जायचं असेल तर भारतीयांनी स्व:ताला कामात पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे, असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर करत कंगाने हे मत व्यक्त केलं आहे.
कंगनाने नेमकं काय म्हटलं?
कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जूना व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे ज्यात पंतप्रधान मोदी देशासाठी आपण 24 तास काम करण्यासाठी तयार असल्याचे सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने, "आपण झपाटून काम करण्याची पद्धत स्वीकारली पाहिजे. विकेण्डची वाट पाहत बसणे आपण थांबवलं पाहिजे. सोमवारी कामावर जावं लागतं यासंदर्भातील मिम्स शेअर करत केलं जाणारं रडंगाणंही थांबवलं पाहिजे. विकेण्ड आणि आठवड्याच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य देशांची संस्कृती आहे. आपण अजून विकसित देश झालेलो नाही. " असं म्हटलं आहे.
नारायण मूर्तीं यांचे विधान
यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. तरुणांनी 70 तास काम करण्याची तयारी दर्शवावी असे ते म्हणाले होते. त्याच्या या विधानावरून त्यांना मोठया टिकेला त्यांना समोर जावं लागलं होतं. "भारतात कामासंदर्भातील प्रोडक्टीव्हीटी ही जगात सर्वात कमी आहे. आपण आपल्या कामाची प्रोडक्टीव्हीटी वाढवली नाही तर आपल्याला इतर देशांबरोबर प्रगतीच्याबाबतीत मागे राहू.असे ते म्हणाले होते. त्यामुळेच मी तरुणांना विनंती करेन की त्यांनी, 'हा माझा देश आहे, मी आठवड्यातील 70 तास काम करेन' असं म्हणायला हवं," असं विधान मूर्ती यांनी केलं होतं.
दरम्यान, कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून 74 हजारांहून अधिक अशा मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. जिंकल्यापासून सातत्याने ती चर्चेत आहे. निवडणुकीसाठी तिने जोरदार प्रचार केला. जिंकून आल्यानंतर चंदीगढ विमानतळावर तिला कानशीलात लगावण्यात आल्याच्या प्रकरणामुळेही ती चर्चेत राहिली. त्यानंतर मोदींच्या शपथविधीला ही कंगनाने हजेरी लावली होती.