बॉलिवूड अभिनेत्री कंंगना रनौत (Kangana Ranaut) ही आज अखेरीस मुंंबईत परतणार आहे. आपले मुळ राज्य सोडण्याआधी तिची नियमाप्रमाणे कोरोना चाचणी (Coronavirus Tests) करण्यात आली असुन कंंगनाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे काही वेळापुर्वीच कंंगना हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मधील भांंवला गावहुन चंडीगढ़ साठी निघाली आहे, चंडीगढ़ वरुन मुंंबईला येणार्या विमानाने ती आज संध्याकाळ पर्यंत शहरात दाखल होईल अशी माहिती आहे. काही दिवसांंपुर्वी कंंगनाच्या वडिलांंच्या मागणीनुसार हिमाचल प्रदेशने केलेल्या शिफारशी नुसार तिला Y+ Security पुरवण्यात येणार आहे त्यामुळे आज जेव्हा कंंगना मुंंबईत येईल तेव्हा तिच्यासोबत हे सुरक्षा रक्षक व कमांंडोज सुद्धा असतील. Kangana Ranaut To Anil Deshmukh: माझी ड्रग्ज टेस्ट करा,चुक आढळली तर मुंंबई कायमची सोडेन- कंंगना रनौत
मागील काही दिवसांंपासुन कंंगना रनौत विरुद्ध महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) असा वाद रंगला आहे. ज्यावरुन कंंगनाने मी 9 तारखेला (आज) मुंंबईत परत येतेय हिंंमत असेल तर मला अडवुन दाखवा असे आव्हान दिले होते तर शिवसेना (Shivsena) महिला आघाडी ते समर्थकांंनी सुद्धा कंगना मुंंबईत आली तर तिचं थोबाडंं फोडु इतकी तीव्र भुमिका घेतली होती. अखेरीस आज जेव्हा कंंगना मुंंबईत परत येईल तेव्हा काय होणार याबाबत सर्वांंनाच उत्सुकता आहे. Kangana Ranaut हिला मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाचे काम थांबविण्याची BMC कडून नोटिस
कंंगना निघाली मुंंबईला (ANI ट्विट)
Himachal Pradesh: Actor Kangana Ranaut leaves from Bhanwla village in Mandi District for Chandigarh.
From Chandigarh, she will be leaving for Mumbai. pic.twitter.com/un6YrNvbnG
— ANI (@ANI) September 9, 2020
Actor Kangana Ranaut has tested negative for #COVID19: Dr Devender Sharma, Chief Medical Officer, Mandi District. #HimachalPradesh
— ANI (@ANI) September 9, 2020
दरम्यान, काल सुशांंत सिंंह राजपुत मृत्युप्रकरणातील बहुचर्चित नाव म्हणजेच सुशांंतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला NCB कडुन अटक करण्यात आली आहे. रियाने आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिल्यावर काल संध्याकाळी तिला अटक करण्यात आली होती. तिची सुद्धा सायन रुग्णालयात रीतसर वैद्यकीय तपासणी करुन ती स्वस्थ असल्याचे समजल्यावर ताब्यात घेण्यात आले होते.