25 वर्ष काम केल्यावरही मला outsider सारखं वाटतं; Manoj Bajpayee चा खुलासा
Manoj Bajpayee (Photo Credits: Twitter)

25 वर्ष काम केल्यानंतरही मला चित्रपटसृष्टीमध्ये एखादा outsider असल्यासारखंच वाटतं, असं नुकतंच मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) याने 'झूम'ला दिलेल्या एका एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत म्हटलं आहे. मध्यंतरी तापसी पन्नूने (Taapsee Pannu) अजूनही मला एक outsider असल्याची जाणीव होत राहते', असं विधान केलं होतं. त्याबाबत विचारले असता मनोज बाजपेयी बोलत होता. बॉलीवूड बद्दल आपलं मत मांडताना तो म्हणतो की जोवर तुमच्या नावासमोर 'A lister' चा शिक्का लागत नाही, तोपर्यंत तुमचं स्वागत असंच होत राहणार.

1994 साली पदार्पण केलेल्या 'सत्या' चित्रपटामुळे घराघरांत पोचलेल्या मनोज बाजपेयीने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमधून लक्षवेधी आणि संस्मरणीय भूमिका केलेल्या आहेत. त्याने खास स्वतःचा असा एक चाहतावर्ग तयार केलेला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'द फॅमिली मॅन' या सिरीज मधल्या त्याच्या भूमिकेचंही बरंच कौतुक झालं. पण एवढं असूनही आपल्याला आपणही एक घटक असल्याची भावना मनात जागृत होत नाही, असे त्याने म्हटले आहे.

''जेव्हा तुम्ही त्यांचं लांगुलचालन करू लागता, प्रत्येक गोष्टीला होकार देऊ लागता, तेव्हा चित्र बदलू शकतं. पण तुम्ही जर स्वतंत्र विचारांचे असाल, तुम्हाला काही मत असेल, तर तुम्हाला संमती मिळत नाही. मी स्वतःच्या जीवावर इथपर्यंतचा प्रवास पार केला आहे'', असं तो म्हणाला. तसेच घराणेशाहीच्या (Nepotism) मुद्द्यावर प्रसारमाध्यमांना दोष देत ''त्यांना सुरवातीलाच उत्तम संधी प्राप्त होतात त्याबद्दल मला वाईट वाटत नाही, वाईट या गोष्टीचं वाटतं की माध्यमं पदार्पणाच्या आधीच त्यांना डोक्यावर चढवून ठेवतात'', असं त्याने मत मांडलं. (हेही वाचा. 'बागी 3' चित्रपटात रितेश देशमुख याची लागली वर्णी)

मनोज बाजपेयी आता प्रेक्षकांना 'बाघी 3' या चित्रपटात दिसेल. तसेच लवकरच अव्हेंजर स्टार ख्रिस हेमस्वर्थ (Chris hemsworth) सोबत 'ढाका' नावाच्या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरु होत आहे.