War मध्ये रॉ एजन्ट साकारल्यानंतर आता Hrithik Roshan करणार एका स्पायची भूमिका?
Hrithik Roshan in War (Photo Credits: YouTube Still)

'सुपर 30' (Super 30) आणि वॉरच्या (War) यशामुळे ह्रितिक रोशनची (Hritik Roshan) गाडी सध्या सुसाट धावत आहे. त्यातच आता राकेश रोशन सुद्धा कॅन्सर मधून बाहेर आल्यामुळे क्रिश 4 (Krrish 4) चं रखडलेल्या काम पुन्हा सुरु होईल. तर दुसरीकडे फराह खान दिग्दर्शित सत्ते पे सत्ता च्या रिमेक मध्येही तो झळकणार आहे. आणि आता हे कमी की काय म्हणून अजून एका सिनेमासाठी त्याला विचारणा करण्यात आली आहे. निखिल अडवाणी (Nikkhil Adwani) निर्मिती करत असलेल्या या सिनेमाची कथा ही 80-90 च्या दशकातली असून एका स्पायची ही कहाणी असणार आहे. 'लखनऊ सेंट्रल' सिनेमाचा दिग्दर्शक रणजीत तिवारी (Ranjit Tiwari) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अजूनही ह्रितिकने सिनेमासाठी होकार दिलेला नाही.

(हेही वाचा. मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा)

खूप दिवसांपूर्वी या सिनेमासाठी शाहिद कपूरला विचारणा करण्यात आली होती. पण शाहिद कपूरने अव्वाच्या सव्वा रक्कम मागितल्यामुळे निखिल अडवाणी दुसऱ्या अभिनेत्यांच्या शोधात होता. ह्रितिकसाठी ही भूमिका काहीशी नव्या स्वरूपाची असणार आहे. याआधी जरी त्याने एजन्टची भूमिका केली असली तरीही एखाद्या स्पायची आणि त्यातही अशी 80-90 च्या काळातली एखादी भूमिका हे त्याच्यासाठी नवं आव्हान असणार आहे. तसेच वॉरच्या अभूतपूर्व यशानंतर आता ह्रितिकसुद्धा व्यावसायिक भूमिकांच्या शोधात आहे. त्यामुळे तो ही भूमिका स्वीकारतो का आणि स्वीकारली तर कशी करतो हे पाहणं रंजक ठरेल.