Satte Pe Satta च्या रिमेक साठी Hrithik-Anushka च्या नावावर शिक्कामोर्तब; पहिल्यांदाच सोबत झळकणार रुपेरी पडद्यावर
Hrithik Roshan & Anushka Sharma | (Picture Credit: Instagram)

1982 साली आलेल्या सत्ते पे सत्ता (Satte Pe Satta) च्या रिमेक मध्ये कोण काम करणार अशी चर्चा बरेच दिवस झाले रंगत होती. पण आता ह्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. अखेरीस ह्रितिक रोशन (Hrithik Roshan) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोघंही अनुक्रमे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीच्या भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने दोन्ही कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्यापही ठरले नसले तरी चित्रीकरणाला 2020 मध्ये सुरुवात होणार असून 2021 मध्ये पुन्हा एकदा 'चैन खुली की मैन खुली' चा नाद सिनेमागृहात घुमणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खान (Farah Khan) करत असून रोहित शेट्टी (Rohit Shetty) निर्मिती करत आहे. (हेही वाचा. 'वॉर' चित्रपटासाठी बनवलेल्या बॉडी मागच्या अचाट मेहनतीचं दर्शन घडवणारा ह्रितिकचा हा व्हिडिओ पाहिलात का?)

'सत्ते पे सत्ता' हा चित्रपट त्या काळी प्रचंड चालला होता. सात भावांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. तसेच यात त्यांचा डबल रोलही होता. राज सिप्पी दिग्दर्शित हा चित्रपट मूळ हॉलीवूड चित्रपट 'सेव्हन ब्राईडस फॉर सेव्हन ब्रदर्स' या चित्रपटावर आधारित होता. तसेच मराठीत आलेल्या 'आम्ही सातपुते' या चित्रपटाची कथाही यावरच आधारित होती.