'वॉर' चित्रपटासाठी बनवलेल्या बॉडी मागच्या अचाट मेहनतीचं दर्शन घडवणारा ह्रितिकचा हा व्हिडिओ पाहिलात का?
Hrithik Roshan | (Picture Credit: Instagram)

ह्रितिक रोशनने (Hrithik Roshan) वॉर (War) चित्रपटासाठी बनवलेल्या बॉडी मागच्या मेहनतीचं दर्शन घडवणारा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर आला आणि बघता बघता व्हायरल झाला. एका दिवसांत ह्या व्हिडिओला 20 लाखांहून अधिक व्ह्यूस मिळाले आहेत.

दोन मिनिटांच्या ह्या व्हिडिओ मध्ये ह्रितिकचा एका वर्षाचा पूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. सुपर 30 (Super 30) या आनंद कुमार (Anand Kumar) यांच्या आयुष्यावरील चित्रपटानंतर सुटलेलं शरीर ते वॉर मधला पिळदार देह हे परिवर्तन कसं झालं हे आपल्याला यात पाहायला मिळतं. आनंद कुमारची भूमिका करताना ह्रितिकला एका सामान्य माणसासारखं दिसणं भाग होतं. म्हणूनच त्याने कमावलेल्या शरीरावर त्याला काही काळ पाणी सोडावं लागलं होतं. पण वॉर  साठी मेहनत घेऊन त्याने गोष्टी पूर्ववत केल्या.

पहा व्हिडिओ:

ह्रितिकचा हा व्हिडिओ खूपच प्रेरणादायी आहे. मनावर घेतलं आणि त्या अनुशंघाने मेहनत घेतली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हे आपल्याला हा विडिओ पाहून कळतं. चित्रपटांसाठी शरीरावर हे असे प्रयोग करणं ही जुनी गोष्ट आहे. 3 वर्षांपूर्वी आमिर खानने (Aamir Khan) सुद्धा दंगल  (Dangal) चित्रपटाच्या वेळी असाच एक व्हिडिओ शेयर केला होता. (हेही वाचा. एका वर्षानंतर नाना पाटेकर पुन्हा येताहेत प्रेक्षकांच्या भेटीला, #metoo च्या वादानंतर पहिल्यांदाच पडद्यावर)

वॉर  या चित्रपटाला या गोष्टीचा फायदा झाला असे नक्कीच म्हणता येईल. ह्या चित्रपटाची तिकीटबारीवरची घोडदौड जोरात सुरू आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २०० कोटींच्या वर गल्ला जमवला आहे.