जगप्रसिद्ध YouTube सुपरस्टार PewDiePie लग्नाच्या बेडीत, गर्लफेंड Marzia Bisognin सोबत केला विवाह
PewDiePie आणि त्याची गर्लफ्रेंड Marzia Bisognin | (Photo Credits: Twitter)

जगप्रसिद्ध स्वीडिश यूट्यूब सुपरस्टार प्यूडीपाई (PewDiePie) विवाहबद्ध झाला आहे. गर्लफ्रेंड Marzia Bisognin हिच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर PewDiePie याने आपल्या विवाहाची बातमी सोशल मीडायाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. Marzia Bisognin आणि PewDiePie हे दोघे गेले प्रदीर्घ काळ एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. त्यांचे डेटवर जाणे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असे. PewDiePie हे या जगप्रसिद्ध असलेल्या या युट्यूब स्टारचे टोपन नाव आसून, त्याचे खरे नाव Felix Kjellberg असे आहे. तो गेमर आणि कमेंटेटरसुद्धा आहे.

Marzia Bisognin हिच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर PewDiePie ने आपल्या विवाहाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. शेअर केलेल्या फोटोखाली PewDiePie ने म्हटले की, 'आता आम्ही विवाहीत आहोत! मी अत्यंत खूश आहे. एक अद्भुत अशी मुलगी माझ्या जीवनाचा हिस्सा झाली आहे. PewDiePie याच्या विवाहाची बातमी सोशल मीडियावर येताच त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला.

PewDiePieट्विट

दरम्यान, PewDiePie ची पत्नी Marzia Bisognin हिनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचा फोटो शेअर केला आहे. आपल्या फोटोखाली तिने म्हटले आहे की, 8 वर्षांपूर्वी 19 ऑगस्ट रोजी आम्ही एकमेकांना भेटलो होतो. पुढे आमची मैत्री झाली जी प्रेमात परावर्तीत झाली. आम्ही आमचा विवाह आमचे कुटुंबीय आणि जवळच्या दोस्तांच्या उपस्थितीत केला. हा माझ्यासाठी एक अत्यंत आनंदी दिवस होता. जो मी कायम माझ्या हृदयात जपून ठेवेन. मी सर्वांची अभारी आहे. माझा विवाह पार पडण्यासाठी आपण सर्वांनी सदिच्छा दिल्या. मी खूप आभारी आहे. (हेही वाचा, Priyanka Chopra Nick Jonas Wedding : प्रियांका -निकचं विवाहस्थळ उमेद भवन पॅलेसचे खास फोटोज)

Marzia Bisognin इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, Felix Kjellberg हे खरे नाव असलेला प्यूडीपाई हा स्वीडिश युट्यूबर, गेमर आणि कमेंटेटर आहे. सोशल मीडियात त्याचे चाहते आणि फॉलोअर बहुसंख्य आहेत. इतके की त्याने टी-सीरीज (T- Series) या युट्यूबवर भारत लोकप्रिय असलेल्या म्यूजिक कंपनीलाही आव्हान दिले होते. त्याच्या फॉलोअर्सची संख्या प्रसारमाध्यमांतू चर्चेचा विषय ठरल्या होत्या.