Met Gala 2021: किम कर्दाशिया हिच्या ड्रेसवरुन युजर्सकडून सोशल मीडियात मिम्सचा पाऊस, रिहानाच्या बॉयफ्रेंडला ठरवले कँडी क्रश
Met Gala 2021 (Photo Credits-Twitter)

Met Gala 2021 ला सुरुवात झाली आहे. हॉलिवूड मधील प्रसिद्ध सेलेब्सने या मेट गाला मध्ये उपस्थितीत लावली. आपल्या खास थीमसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेट गालासाठी यंदा सुद्धा हटके पद्धतीचे आउटफिट्स पहायला मिळाले. या वर्षी Met Gala 2021 ची थीम IN America: A Lexicon of Fashion आहे.(हॉलिवूड अभिनेता Tom Cruise ला चोरांनी लुबाडले; BMW कार व गाडीतील कोट्यावधी रुपयांचे सामान चोरीला)

द मेट्रोपॉलिन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये आयोजित या सोहळ्याला हॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार जसे किम कर्दाशिया, रिहाना, जेनिफर लोपेज, मेगन फॉक्स, बिली ईलिश, टिमथी शैलेमे, नाओमी ओसाका, Lil Nas X सह अन्य काही जणांनी उपस्थिती लावली होती. या सर्वांच्या आउटफिट्समुळे आता सोशल मीडियाच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरुन मिम्स पोस्ट केले जात आहेत.

किम कर्दाशिया बद्दल बोलायचे झाल्यास Balenciaga ब्रँन्डचा डोक्यापासून ते पायापर्यंतच्या आउटफिट्समध्ये ती दिसून आली. याचवरुन तिला आता ट्रोल केले जात आहे. किम हिची हॅरी पॉटर मध्ये दिसून येणाऱ्या Dementer सोबत तुलना केली आहे. या व्यतिरिक्त काही युजर्सने म्हटले ती व्हिडिओ गेम मधील लॉक सारखी दिसून येत आहे.(Oscars 2021 Winner List: ऑस्कर 2021 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरला 'Nomadland', येथे पाहा विजेत्यांची यादी)

तसेच पॉप सिंगर रिहाना हिच्या बॉयफ्रेंडला कँडी क्रश म्हणून बोलले जात आहे. कारण त्याचे आउटफिट्स पाहून आता सर्वांनी त्याला सुद्धा निशाण्यावर धरले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या कारणास्तव मेट गाला जवळजवळ दोन वर्षानंतर आयोजित करण्यात आले आहे. काही बड्या सेलेब्सने यंदाच्या वर्षी मेट गालासाठी उपस्थिती लावली. . यामध्ये कायली जेनर ही सुद्धा दिसून आली. या वर्षाच्या इवेंटमध्ये सिंगर बिली ईलिश, अभिनेत्री टिमथी शॅलेमे, टेनिसपटू नाओमी ओकासा आणि पोएट अमांडा गोर्मन होस्ट करत आहेत.