अभिनेता धनुष सह 'मदारी' गाण्यावर थिरकली फ्रेंच एक्ट्रेस बेरेनिस बेजो, पाहा व्हिडियो
Madaari Song (Photo Credits: YouTube)

'कोलावेरी डी' या गाण्याने अगदी लहानग्यांपासून ते ज्येष्ठांना वेडं लावलेला दाक्षिणात्य अभिनेता धनुष (Dhanush) ने आता फ्रेंच अभिनेत्री बेरेनिस बेजो (Berenice Bejo) ला आपल्या तालावर नाचण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. टॉलिवूड, बॉलिवूड करत करत आता हॉलिवूड पर्यंत धनुषने  मजल मारली असून त्याच्या आगामी 'The Extraordinary Journey of the fakir' या चित्रपटातील 'मदारी' (Madaari) हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. यात धनुष फ्रेंच अभिनेत्री बेरेनिस बेजोसह मदारी च्या देसी ठुमक्यावर थिरकताना दिसत आहे.

या गाण्याचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे ऑस्कर नॉमिनेटेड फ्रेंच अभिनेत्री बेरेनिसला स्वत: ला धनुष देसी ठुमक्यांचे धडे दिले आहे. तर दुसरीकडे बेरेनिस ने या चित्रपटासाठी फ्रेंच भाषा शिकण्यासाठी धनुषला मदत केली आहे. बेरेनिस या आधी कोणत्याच हिंदी गाण्यावर डान्स केला नव्हता. त्यामुळे धनुषने ही आपल्या स्टाईलमध्ये तिला हा डान्स शिकवला आहे.

धनुष ने बेरेनिस ला असे काही नृत्याचे धडे दिले की, तुम्ही हे गाणे पाहिले तर तुम्हाला हे कळणारसुद्धा नाही की हा तिचा पहिला प्रयत्न आहे.

कोण आहेत 'मा आनंद शीला'? 'या' भूमिकेतून झळकणार प्रियांका चोप्रा

या गाण्याला आवाज दिला आहे संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल डडलानी आणि निकिता गांधी यांनी. या गाण्यात देसी ठुमक्यांबरोबर डान्सिंग लीजेंड मायकल जॅक्सनचेही काही मूव्ह्स वापरण्यात आले आहेत.

'The Extraordinary Journey of the Fakir ' हा चित्रपट 21 जूनला भारतासह आणखी 7 ठिकाणी प्रदर्शित होई