IMDb's Most Popular Indian Star of 2022 । PC: FB

अवघ्या 23 दिवसांमध्ये आपण 2022 या वर्षाला निरोप देणार आहे. कोविड संकटानंतर पुन्हा सारं स्थिर स्थावर होत असल्याची चिन्हं असताना मागील वर्षात पुन्हा सिनेक्षेत्रानेही  नव्याने सुरूवात केली आहे. IMDb, या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वांत प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोताने 2022 च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची (Most Popular Indian Star of 2022) घोषणा केली आहे. IMDb वर असलेल्या महिन्याला 20 कोटी विजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप टेन यादी निर्धारित केली आहे. द ग्रे मॅन (The Gray Man) आणि तिरूचित्राम्बालाम (Thiruchitrambalam) यासह अनेक भाषांमध्ये सफल कलाकृतींमध्ये भुमिका बजावलेला धनुष (Dhanush) ह्या वर्षीच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. त्या पाठोपाठ दुसर्‍या स्थानी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि तिसर्‍या स्थानी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आहे.

IMDb चे 2022 साठीचे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलाकार

1. धनुष

2. आलिया भट्ट

3. ऐश्वर्या राय बच्चन

4. राम चरण तेजा

5. समंथा रूथ प्रभू

6. हृतिक रोशन

7. कियारा अडवानी

8. एन. टी. रामा राव ज्यु.

9. अल्लु अर्जुन

10. यश

“जगभरातील लोक भारतीय सिनेमा, वेबसिरीज आणि कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी IMDb वर येतात आणि भारतीय कलाकारांची आमची टॉप 10 यादी ही जागतिक प्रसिद्धी निर्धारित करण्याचा आणि करिअरमधील मुख्य टप्पे आणि लक्षवेधी क्षण ओळखण्याचा मापदंड ठरली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “विविध क्षेत्रांमधील कलाकारांना जगभर नावाजले जाते व देशामध्ये त्यांच्या प्रतिभेच्या उंचीचे हे निदर्शक आहे. धनुषसारख्या कलाकाराला मान्यता मिळून तो हॉलीवूड अभिनेते जसे रायन गोसलिंग आणि क्रिस इव्हान्सच्या सोबत भुमिका करताना दिसला आणि त्याबरोबर प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या RRR चित्रपटातील एन टी रामा राव ज्यु आणि राम चरण तेजा ह्यांचेही कौतुक केले जाते. समीक्षक आणि चाहत्यांनीही चित्रपटांमध्ये परतलेल्या ऐश्वर्या राय बच्चनचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले.”

IMDb सोबत एक्सक्लुझिव्हली बोलतना आलिया भट्टने ह्या वर्षीच्या यादीमध्ये तिचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “2022 हे माझ्यासाठी चित्रपटांसंदर्भात आत्तापर्यंतचे सर्वांत संस्मरणीय वर्ष ठरले आहे- ह्या वर्षी माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमी त्यांची ऋणी राहीन आणि आपल्या देशातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते व कलाकारांसोबत काम करणे, हा माझा गौरव आहे असे मला वाटते. IMDb हे लोकांच्या मनामधील भावना दर्शवणारे खरे माध्यम आहे आणि मला आशा आहे की, मी‌ जोपर्यंत कॅमेरासमोर असेन, तोपर्यंत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन. प्रेम आणि प्रकाश. आपल्याला परत एकदा धन्यवाद.”

अव्वलस्थानी असलेला धनुष 2022 मध्ये पाच भुमिकांमध्ये झळकला; नेटफ्लिक ओरिजिनल द ग्रे मॅन, आणि तमिळ भुमिका- मारन, तिरूचित्राम्बालाम, नानेवरुवेन आणि वाती या सिनेमांमध्ये झळकला आहे.  एस. एस. राजामौलीच्या भव्य RRR (राईज रोअर रिवॉल्ट) मधील आघाडीची कलाकार आलिया भट्ट दुसर्‍या स्थानी आहे. तर  राम चरण तेजा चौथ्या स्थानी आहे आणि एन टी रामा राव ज्यु  आठव्या क्रमांकावर आहेत. आलिया भट्टने गंगुबाई काठियावाडीद्वारेही चाहत्यांचे मनोरंजन केले आणि तिने डार्लिंग्जमध्येही मुख्य भुमिका केली (जी तिची नेटफ्लिक्सवर निर्मितीसुद्धा होती), तसेच जगभर हिट झालेल्या ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवामध्ये ईशा म्हणूनही तिने भुमिका केली. पाच वर्षांनी सिनेमामध्ये परत येणा-या ऐश्वर्या राय बच्चनला या क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळाला आहे.  पोनियन सेल्वन: पार्ट 1 मधील आपल्या विशेष भुमिकेमध्ये बघण्यासाठीही चाहते उत्सुक होते. बॉलिवूड अभिनेत्री  कियारा अडवानी  सातव्या क्रमांकावर आहे तिने  जुगजुगजियो आणि भूलभुलैया 2 अशा दोन ब्लॉकबस्टर भुमिकांद्वारे श्रोत्यांचे मनोरंजन केले.