अभिनेत्री डेनिस रिचर्ड्स (Actor Denise Richards) आणि तिच्या पतीवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. TMZ ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे घडली. रोड रेज (Road Rage) प्रकारात मोडणाऱ्या या घटनेत अज्ञात व्यक्तीने या दाम्पत्याच्या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला. अभिनेत्री डेनिस रिचर्ड्स आणि पती आरोन फिपर्स (Aaron Phypers) हे एका स्टुडीओकडे निघाले होते. रिचर्ड्स वाहन चालवत होता. पार्कींगसाठी जागा शोधण्यासाठी त्यांनी वाहन उभे केले असता ही घटना घडली. या घटनेत दोघे पती-पत्नी थोडक्यात बचावले.
प्राप्त माहितीनुसार, रिचर्ड्सचे पती आरोन फिपर्स गाडी चालवत होता. दोघे पार्किंग शोधण्यासाठी थांबले आणि तेव्हाच त्यांच्या मागे एक माणूस (कारमधून) चिडला आणि ओरडू लागला. पाठिमागच्या कारमध्ये असलेल्या आणि चिडलेल्या माणसाच्या चालकाने आपली कार त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिपर्स याने त्याला बाजू दिली नाही. त्यानंतर तो गाडीतून उतरुन पुढे आला आणि त्याने गोळीबार केला. त्याने झाडलेली एक गोळी ड्रायव्हरच्या सीटच्या मागील बाजूस जाऊन आदळली. या घटनेत कारचे नुकसान झाले. पण दोघेही थोडक्यात वाचले. TMZ ने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Sex With 200 People: '200 लोकांसोबत ठेवले शारीरिक संबंध'; American Pie ची अभिनेत्री Jennifer Coolidge चा धक्कादायक खुलासा)
दरम्यान, जीवित हानी अथवा दुखापत टळली असली तरी या घटनेमुळे डेनिस रिचर्ड्स चांगलीच घाबरली. हादरुन गेलेली डेनिस रिचर्ड्स सेटवर रडत रडतच पोहोचली. क्रुच्या सदस्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यातील एकाने तिच्या कारमध्ये बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी आणि कारमध्ये सीटला पडलेले भोकही पाहिले. त्यानंतर त्यांनी 911 वर कॉल केला. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने सांगितले की ते स्लॉसन आणि वेस्टर्न अव्हेन्यूजच्या चौकात घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत.