Actor Johnny Wactor Death: अभिनेता जॉन वेक्टर यांची गोळी झाडून हत्या, हॉलिबूड चित्रपटसृष्टीत शोककळा
actor Johnny Wactor PC TWITTER

Actor Johnny Wactor Death: हॉलिबूड चित्रपटसृष्टीतला प्रसिध्द अभिनेता 'जॉनी वेक्टर' (Actor Johnny Wactor) यांची हत्या करण्यात आली आहे. अभिनेता जॉनी वॅक्टर यांनी 'जनरल हॉस्पिटल' या शोमध्ये ब्रॅडो कॉर्बिनच्या भुमिकी निभावली होती. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गोळी घालून त्यांनी हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अभिनेत्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर चाहत्यांमध्ये शोक पसरला आहे. (हेही वाचा- प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सिकंदर भारती यांचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री जॉनी आपल्या मित्रांसोबत पार्टीवरून घरी जात होता. त्यावेळी त्याच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणारे तीन अज्ञात दिसले. त्याचवेळी अभिनेत्यांनी कारजवळ धाव घेतला. तीन चोरट्यांपैकी एकाने अभिनेत्यावर गोळी झाडली. या गोळीबारच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबाना देण्यात आली.

जॉनच्या निधनाची माहिती त्यांच्या आईने माध्यमांना दिली. त्यांनी माध्यमांना सांगितले की, पोलिसांन ी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे परंतु अद्याप हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात नाही. अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबानावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहली आहे.