ईशा गुप्ता (फोटो सौजन्य- ट्विटर)
बॉलिवूडमधील रुस्तम, कमांडो, हादशाहो यांसारख्या एकापेक्षा एक दमदार चित्रपटातून झळकणारी ईशा गुप्ताला तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून तिला नेटकऱ्यांनी सुनावले ही आहे.
ईशा गुप्ताने सध्या नवीन फोटो शूट केले आहे. त्यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्टही केले. तर तिच्या चाहत्यांनी तिला फोटोवर भरभरुन प्रेम देऊ केले आहे. मात्र त्या फोटो शूटच्या वेळचा ईशाने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हाताचे मधले बोट असलेला एक व्हिडिओ तिने पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे. तर काही नेटकऱ्यांनी, 'या पद्धतीचे कपडे घालून मधले बोट दाखवणे हे आई वडिलांचे संस्कार आहेत का?' असे सुनावले आहे.
तर ईशाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला. यापूर्वीसुद्धा ईशाने आपले बोल्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र ईशा हिने आपल्या लुकने बॉलिवूड क्षेत्रात छाप पाडली आहे.