Nine Rasa: अभिनेता Shreyas Talpade ने सादर केला 'नाइन रसा' नावाचा स्वतःचा OTT Platform; पहायला मिळणार खास थिएटर आणि परफॉर्मिंग आर्टबाबत कंटेंट (Watch Video)
Shreyas Talpade (Photo Credits: Instagram)

कोविड-19 (Coronavirus) मुळे चित्रपटगृहे, थिएटर बंद झाली आहेत. यामुळे अनेक चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) थिएटर आणि परफॉर्मिंग आर्टसाठी (Theatre and Performing Arts) एक नवा ओटीटी प्लॅटफॉर्म सादर केला आहे. या प्लॅटफॉर्मचे नाव 'नाइन रसा' (Nine Rasa) असे आहे. या व्यासपीठावर प्रेक्षक पूर्ण लांबीची नाटके, लहान नाटके, नृत्य, कविता, कथा वाचन, माहितीपट अशा अनेक कलांचा आनंद घेऊ शकतील. या व्यासपीठावर उपलब्ध साहित्य हे हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी/हिंग्लिश या चार भाषांमध्ये असेल.

पुढे जाऊन बंगाली, मल्याळम, राजस्थानी, हरियाणवी यांसारख्या इतर भारतीय भाषांमधील कंटेंट इथे पहायला मिळेल. आजपासून हा प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'नाइन रसा' विषयी बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला, ‘मी नाइन रसाबद्दल खूप उत्सुक आहे. मला वाटते की हा जगातील पहिला ओटीटी व्यासपीठ असेल जो केवळ आणि फक्त नाट्य आणि परफॉर्मिंग आर्टसाठी समर्पित आहे. इथे आपल्याला सर्व स्टेज परफॉरमेंस पहायला मिळतील.’ जसे एखादे नाटक स्टेजवर सादर केले जाते तसेच ते इथे दिसणार आहे. शुटींगसाठी मल्टी कॅमेर्‍याचा वापर केला जातो. (हेही वाचा; Farhan Akhtar लवकरच झळकणार Marvel Studios सोबत एका आंतरराष्ट्रीय कलाकृतीमध्ये, Bangkok मध्ये शुटिंग सुरू - रिपोर्ट्स)

कोरोनामुळे प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊ शकत नाहीत, पण श्रेयस तळपदेच्या या प्रयत्नामुळे थिएटर प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. वस्तुतः श्रेयस तळपदे याने थिएटर विश्वातील लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने हा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. लॉकडाऊन दरम्यान, श्रेयस तळपदेने तंत्रज्ञ, अभिनेते आणि लेखक इत्यादींसाठी 1500 हून अधिक रोजगार या व्यासपीठाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. याचे 'नाइन रसा' ही नाव ‘नऊ रस’वरून आले आहे, ज्याचा अर्थ नऊ भावना असा होतो. या प्लॅटफॉर्मसाठी, आधीच शूट केलेली नाटके घेण्याऐवजी श्रेयसच्या टीमने तब्बल 100 तासांचा नवा कंटेंट शूट केला आहे.