डॉ. जब्बार पटेल यांची 100 व्या नाट्यसंमेलन अध्यक्षपदी निवड; नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची घोषणा
Jabbar Patel | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

100'th  Akhil Bharatiya Marathi Natya sammelan: नाट्य रसिकांमध्ये आदराचे स्थान असलेल्या आणि शतकी परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलन ( Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) अध्यक्षपदी जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (Jabbar Patel यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे यंदा 100 वे वर्ष आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. नाट्यसंमेलनाच्या शतकमोहत्सवी वर्षात डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता, दिग्दर्शकाची निवड झाल्याने नाट्यवर्तुळातूनही समाधान व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या वेळी नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि जब्बार पटेल अशा दोघांचेच अर्ज आल होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारी समितीत नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठी आलेल्या दोन्ही अर्जांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेनंत कार्यकारी समिती सदस्यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. येत्या 15 डिसेंबर रोजी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी दिली आहे. (हेही वाचा, या पुस्तकांवर आधारीत आहेत हे लोकप्रिय मराठी सिनेमे)

डॉ. जब्बार पटेल यांनी अभिनय केलेली नाटके

तुझे आहे तुजपाशी, माणूस नावाचे बेट,वेड्याचे घर उन्हात

दिग्दर्शन केलेले सिनेमे

उंबरठा, एक होता विदूषक, जैत रे जैत, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पथिक, मुक्ता, मुसाफिर, सामना, सिंहासन

डॉ. जब्बार पटेल हे जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक नाटक, चित्रपट यांचे दिग्दर्शन केले आहे. पटेल यांनी मराठीत केलेल्या ' सामना', 'सिंहासन', गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत', 'मुक्ता', पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' आदी चित्रपटांचे दिग्दर्शन प्रचंड गाजले. या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.