एका लग्नाची पुढची गोष् Photo Credit: Facebook

कविता मेढेकर आणि प्रशांत दामले ही जोडी म्हटली की ओघाने एका लग्नाची गोष्ट हे नाटकं येतचं. 20 वर्षांपूर्वीच हे नाटक आजही तितकेच रिफ्रेशिंग आहे. म्हणून आता नव्या ढंगामध्ये पुन्हा हे नाटक रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या 17 नोव्हेंबरपासून मुंबईत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. आरण्यक, नटसम्राट, हॅम्लेट, अलबत्या -गलबत्या पाठोपाठ झी मराठीने आता अजून एक नाटक पुन्हा रसिकांसाठी रंगमंचावर आणलं आहे. सिक्वेल स्वरूपात येणार 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे पहिलंच नाटक आहे.

कविता मेढेकर - प्रशांत दामले नव्या रूपात

कविता मेढेकर आणि प्रशांत दामले ही जोडी या नाटकात प्रमुख भूमिका बजावणार आहे. नव्या स्वरूपात येणार्‍या नाटकाचं नाव 'एका लग्नाची पुढची गोष्ट' असे आहे. आता नव्या टप्प्यावर आलेल्या या नाटकात नेमकं काय होणार? याची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं... नव्या रूपात

अशोक पत्कीचं संगीत असलेले 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं...' हे गाणंदेखील या नाटकाचा एक अविभाज्य घटक आहे. नाटक नव्या स्वरूपात येणार तसेच या गाण्यामध्येही नवे बदल करण्यात आले आहेत.

एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाची प्रस्तुती झी मराठीची आहे. तर अद्वैत दादरकर या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. ईम्तीयाझ पटेल हे या नाटकाचे मूळ लेखक आहेत.