डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताला 1 कोटी लोक येतील फक्त बाजूला सनी लिओनी किंवा दीपिका ला उभी करा: राम गोपाल वर्मा
डोनाल्ड ट्रंप (File Image)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  हे सोमवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यासाठी येणार आहेत,यापूर्वी ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या स्वागतासाठी , विमानतळापासून जगातील सर्वांत मोठ्या मोटेरा स्टेडियमपर्यंत 60 लाख ते एक कोटी लोक स्वागतासाठी उपस्थित असतील असा दावा केला होता. याच विधानावरुन आज बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Varma) यांनी एक ट्विट करत थेट ट्रम्प यांना टोलावले आहे. ट्रम्प यांचे स्वागत करायला 1  कोटी लोक येतील सुद्धा मात्र त्यासाठी त्यांच्या बाजूला सनी लिओनी किंवा दीपिका पदुकोण ला उभे करावे लागेल असे वर्मा यांनी ट्विट केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विट मध्ये, 'ट्रम्प यांचे स्वागत करायला 1 कोटी लोकांनी येणे हे नक्कीच होऊ शकतं, फक्त त्यासाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरूख खान, कटरीना कैफ, दीपिका पादुकोण आणि सनी लियोनी यांना ट्रम्प यांच्या बाजूला उभं करायला हवं" या शब्दात उपरोधक प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका: डोनाल्ड ट्र्म्प यांनी भारत दौर्‍यापूर्वी दिले व्यापार कराराबाबत मोठे संकेत; भारत- अमेरिकेदरम्यान होऊ शकते मोठे डील

राम गोपाल वर्मा ट्विट

दरम्यान, अहमदाबाद शहराची एकूण लोकसंख्या जवळपास ७० लाख इतकी आहे. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या 22 किलोमीटरच्या मार्गावर मोदी व ट्रम्प यांच्या रोड शो दरम्यान एक ते दोन लाख लोक उपस्थित राहू शकतात,' असं महानगरपालिकेचे आयुक्त विजय नेहरा यांनी या पूर्वी म्हंटले आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प कोणत्या माहितीच्या आधारे 1 कोटी लोकांची अपेक्षा करतायत हे अद्याप समोर आलेले नाही, तसेच ट्रम्प यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंडनर मोदी काय योजना आखणार हे हि पाहणे महत्वाचे ठरणार आहे.