पीएम नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप (Photo Credit-PTI)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प 24, 25 फेब्रुवारी दिवशी दोन दिवसांच्या भारतीय दौर्‍यावर येणार आहेत. दरम्यान भारत दौर्‍याबाबत डोनालड ट्र्म्प खूपच उत्साहित आहेत. मात्र या दौर्‍यात भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार कराराविषयी संदिग्धता आहे. नुकताच या डोनाल्ड ट्र्म्प यांनी एक व्हिडिओ शेअर करत भारत-अमेरिकेदरम्यान एक मोठा व्यापार करार होऊ शकतो अशाप्रकारची माहिती दिली आहे. दरम्यान व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्र्म्प यांनी पुढील आठवड्यात भारतात येत आहे आणि आम्ही व्यापाराबाबत चर्चा करणार आहोत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत मागील अनेक वर्षांपासून आम्हांला व्यापारामध्ये निराश करत आहेत. मात्र मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात. पण आम्हाला व्यापारही करायचा आहे. जगभरात सर्वाधिक टॅरिफ असलेल्यांमध्ये भारताचा समावेश आहे. काल (20 फेब्रुवारी) लास वेगासमध्ये बोलताना ते म्हणाले, 'आम्ही भारतामध्ये जात आहोत. तेथे आम्ही एक महत्त्वाचं डील करू शकतो परंतू त्यांना ते पसंत न पडल्यास चर्चांचा वेग मंदावू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा.  

डोनाल्ड ट्र्म्प यांनी दिलेल्या संकेतानुसार, जर डिल अमेरिकेच्या म्हणण्यानुसार झाला नाही तर त्याची प्रक्रिया मंदावू शकते. आम्ही अमेरिकेला पहिल्याच स्थानावर ठेवणार आहोत. त्याच्या दृष्टीने पुढील निर्णय घेतले जातील. मात्र लोकांना आवडो वा न आवडो पण आम्ही अमेरिकेला पहिला स्थानावर ठेवणार आहोत. भारत-अमेरिका दरम्यान गुड्स अ‍ॅन्ड सर्व्हिस मध्ये व्यापार अमेरिकेच्या वैश्विक व्यापारात 3% आहे. भारत दौर्‍यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, पीएम नरेंद्र मोदी माझ्या पसंतीचे पण व्यापार करार होणार नसल्याचे दिले संकेत.  

ANI Tweet  

सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या कुटुंबासमवेत भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांना भारत दौऱ्यासाठी पुन्हा आमंत्रण दिले होते. लवकरच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान भारत-अमेरिकेमधील संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. तसेच ट्रम्प आणि मोदी यांच्यातही चर्चा होईल. त्यासाठी अहमदाबाद, दिल्लीमध्ये मोठी तयारी केली जात आहेत.