बॉलिवूड मध्ये हिट मशीन म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांच्या यादीत मागील काही काळापासून ऍड झालेले नाव म्हणजे आयुष्यमान खुराना (Ayushman Khurana) . आपला आगामी चित्रपट शुभ मंगल ज्यादा सावधान (Shubh Mangal Zyada Savdhan) च्या माध्यमातून समलैंगिक प्रेमाचा अनोखा विषय घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या कथानकाची आयडिया येताच प्रेक्षकांनी अक्षरशः या सिनेमाला उचलून धरले आहे, आणि साहजिकच हे मोठे धाडस करण्यासाठी आयुष्यमान वर देखील कौतुकाचा वर्षांव होत आहे,केवळ फॅन्सचे नव्हे तर चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सुद्धा या शुभ मंगल ज्यादा सावधान चित्रपटाचे कौतुक केल्याचे समजतेय. अमेरिकेचे मानवाधिकार संरक्षक कार्यकर्तै पीटर टचल यांनी या सिनेमाविषयी लिहीत केलेल्या एका ट्विट वर उत्तर देताना ट्रम्प यांनी ग्रेट असा शेरा दिला आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याआधी समोर आलेलं हे ट्विट आता चांगलंच चर्चेत आलं आहे.
अमेरिकेचे मानवाधिकार संरक्षक कार्यकर्तै पीटर टचल यांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या संकल्पनेचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची स्तुती केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. देशातील या विषयावर प्रबोधन करण्यासाठी बॉलिवूडचा एक नवा चित्रपट सज्ज झालाय. या चित्रपटात समलिंगी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे'.आणि याच ट्विट वर उत्तर देत डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रेट म्हंटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प ट्विट
Great! https://t.co/eDf8ltInmH
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 21, 2020
दरम्यान, हितेश कैवल्य दिग्दर्शित शुभ मंगल ज्यादा सावधान या सिनेमात आयुष्मान खुरानासोबत राज कुमार राव रोमान्स करताना दिसून येणार अशा चर्चा मागील काही काळात ऐकू येत होत्या. याशिवाय जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराव राज आणि पंखुरी अवस्थी यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात समलैंगिक प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत.