भाजप कार्यकर्त्यांची मुजोरी, चक्क प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अंगावर शेण फेकले
दिग्दर्शक प्रियनंदनन (फोटो सौजन्य- ट्वीटर)

भाजप (BJP) आणि राष्ट्रीय सेवा संघाच्या (RSS) कार्यकर्त्यांना प्रसिद्ध दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मान पटकवणारे प्रियनंदनन (Priyanandanan) यांच्यावर शेण फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर शबरीमाला मंदीरावरुन स्रियांच्या प्रवेशावरुन जो वाद सुरु आहे त्याबद्दल प्रियनंदनन यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी चक्क शेण फेकले आहे.

प्रियनंदनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते सकाळी घराबाहेर पडले त्यावेळी काही माणसांनी त्यांना अडवले. त्यावरुन मी लिहिलेल्या पोस्टवरुन त्यांनी मला धक्काबुक्की केली. तसेच सोशल मीडियावरील ती पोस्ट डिलीट करण्याची बळजबरी केल्याचे प्रियनंदनन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे अज्ञात व्यक्ती भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचा आरोपी प्रियनंदनन यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केरळ मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रियनंदनन यांच्यावर शेण फेकून केलेल्या अन्यायाची खंत व्यक्त केली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला आपले मत उघडपणे मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे पिनराई यांनी म्हटले आहे. मात्र भाजपकडून या गोष्टीकडे कानाडोळा करत आम्ही काही असे केले नसल्याची भूमिका दाखवत आहेत.